सुपे येथे घरकुलांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:11 IST2021-03-21T04:11:22+5:302021-03-21T04:11:22+5:30

: बारामती तालुक्यातील सुपे येथे प्रधानमंत्री रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेंतर्गत ग्रूप हौसिंग अंतर्गत सात लाभार्थींच्या घरकुल ...

Bhumipujan of Gharkuls at Supe | सुपे येथे घरकुलांचे भूमिपूजन

सुपे येथे घरकुलांचे भूमिपूजन

: बारामती तालुक्यातील सुपे येथे प्रधानमंत्री रमाई आवास योजना व शबरी आवास योजनेंतर्गत ग्रूप हौसिंग अंतर्गत सात लाभार्थींच्या घरकुल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

येथील कुटुंबांना स्वतःची जागा नसल्याने तसेच ग्रामपंचायतीकडे गावठाण जागा उपलब्ध नसल्याने शासनाच्या गायरान जागेचा पाठपुरावा करुन २६ गुंठे जागा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर यांनी दिली. या जागेवर सद्या ग्रूप हौसिंग अंतर्गत सात लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती नीता बारवकर, सरपंच स्वाती हिरवे, उपसरपंच मल्हारी खैरे, सदस्य शौकत कोतवाल, मुनीर डफेदार, रेखा चांदगुडे, राजश्री धुमाळ, ज्योती जाधव, राष्ट्रवादीचे तालुका युवक उपाध्यक्ष अनिल हिरवे, विलास धेंडे,रघुनाथ हिरवे, अजित बसाळे, विकास जाधव, संतोष जगताप आणि ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

२० सुपे भूमिपूजन

सुपे येथे घरकुलांचे भूमिपूजन भरत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Bhumipujan of Gharkuls at Supe