साकुर्डे येथे विकासकामांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST2021-07-20T04:09:11+5:302021-07-20T04:09:11+5:30

पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर ...

Bhumipujan of development work at Sakurde | साकुर्डे येथे विकासकामांचे भूमिपूजन

साकुर्डे येथे विकासकामांचे भूमिपूजन

पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन केले.

पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग ते रामनगर पवारवाडी (४५.९० लाख) तसेच थोपटेवाडी अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण (५ लाख) या कामांचा समावेश आहे.

कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे, माजी जि. प. सदस्य विराज काकडे, माजी उपसभापती नीलेश जगताप, सरपंच रमेश जाधव, सदस्य सचिन थोपटे, अजित जाधव, राजेंद्र जाधव, तसेच अजित युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे, खरेदी विक्री संघाचे संचालक संग्राम सस्ते, तालुका युवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदेश पवार, सुरेश सस्ते, मोहन जाधव, वामन सस्ते, श्रीकांत सस्ते, विजय पवार उपस्थित होते.

१९ जेजुरी

रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना मान्यवर.

Web Title: Bhumipujan of development work at Sakurde