Bhumata Brigade's Tupati Desai registred complaint against MLA Bachhu Kadu | भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंकडून आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात धनकवडीत तक्रार दाखल 

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंकडून आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात धनकवडीत तक्रार दाखल 

पुणे : अडचणीत असलेल्या विदभार्तील शेतकऱ्यांसाठी आमदार बच्चू कडू भाजपा- शिवसेना विरोधात आंदोलन का करत नाहीत, या फेसबुकपोस्टमुळे निर्माण झालेला वाद पोलिस ठाण्यात पोहचला आहे. आमदार ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू यांच्या विरोधात तृप्ती प्रशांत देसाई यांनी धनकवडी पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे.
भूमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांनी आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही गप्प का ? असा सवाल फेसबुकवर विचारला होता, यावर आमदार बच्चू कडू समर्थकांनी देसाई यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या कमेंट केल्या यावर तृती देसाई यांनी आमदार कडू यांना संपर्क साधला होता. यावर त्यांची चर्चा चालू असतानाच कार्यकर्तांच्या टिप्पणीबाबत बोलणे सुरू होते. तुम्ही मला फेसबुकवर उपदेश देऊ नका , स्वत: ला मोठे समजू नका , शहाणपणा करू नका , अन्यथा तुम्हाला परिणामांना समोरे जावे लागेल, अशी आमदार बच्चू कडू यांनी धमकी दिल्याचे तक्रारदार देसाई यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bhumata Brigade's Tupati Desai registred complaint against MLA Bachhu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.