शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांनी घेतला कष्टाच्या झुणका- भाकरीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:09 IST

पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी आपल्या पुणे दौऱ्या दरम्यान राजशष्टिाचार बाजुला ठेऊन ...

पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी आपल्या पुणे दौऱ्या दरम्यान राजशष्टिाचार बाजुला ठेऊन हमाल पंचायतच्या कष्टाची भाकर उपक्रमास भेट देऊन झुणका आणि भाकरीचा आस्वाद घेतला. झुणक्याची चव आवडल्याने त्यांनी तो पुन्हा मागवला.

हमाल पंचायतच्या ‘कष्टाची भाकर’ या उपक्रमास सवलतीच्या दरात धान्य पुरवठा केला जात होता. गेल्या वर्षीपासून तो बंद केला गेला आहे. सवलतीच्या दराने

धान्य पुरवठा पुर्ववत करावा, या मागणी संदर्भात मंत्री भुजबळ आणि ज्येष्ठ कामगार नेते डॉ.बाबा आढाव यांची चर्चा झाली.

चर्चेमध्ये बाबा आढाव यांनी सद्य:परिस्थितीचा भुजबळ यांना आढावा घेतला. त्यानंतर मंत्री भुजबळ यांनी धान्य पुरवठा कसा सुरळीतपणे चालु करता येईल, याबाबत लवकरच संबंधित अधिकारी यांच्यामध्ये चर्चा करुन योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

धान्य पुरवठा हा केंद्र सरकारकडून होत असतो. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करुन बाबांनी एक पर्याय दिला तर या विषयाबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे सोपे होईल, असे देखील भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष किसन काळे, सचिव संतोष नागरे, खजिनदार विजय चोरघे हमाल पंचायत कष्टकरीचे चंद्रकांत मानकर, दिलीप मानकर, गोरख मेंगडे तसेच अंगमेहनती कष्टकरी

संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार हे देखील यावेळी उपस्थित होते.