शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

भोर ठरतेय चित्रीकरणाची पंढरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 7:11 PM

शहरात व तालुक्यात बाराही महिने विविध मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण सुरु असते. यातून स्थानिकांना विविध प्रकारचे काम मिळते. यामुळे भोर चित्रीकरणासाठी नंदनवन ठरते आहे. 

ठळक मुद्देधरणे, बनेश्वरची बाग, गडकोट किल्ले, इतिहासकालीन वाडे यामुळे चित्रपटसुष्टीतील लोक भोरकडे आकर्षितसेट उभारण्याचा खर्च होत नसल्यामुळे निर्माते व दिग्दर्शकांचा कल भोरकडे  दादा कोंडके यांचा स्टुडिओ मात्र दुर्लक्षित

भोर : शहरातील निरानदी काठावर वसलेला संस्थानकालीन पंतसचिवांचा भव्य दिव्य राजवाडा, संस्थानकालीन घाट, विविध मंदीरे, दगडी इमारती, निर्सगरम्य गावे, आंबवडेचा झुलता पुल, धरणे, बनेश्वरची बाग, गडकोट किल्ले, इतिहासकालीन वाडे यामुळे चित्रपटसुष्टीतील लोक भोरकडे आकर्षित होत आहेत. शहरात व तालुक्यात बाराही महिने विविध मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण सुरु असते. यातून स्थानिकांना विविध प्रकारचे काम मिळते. यामुळे भोर चित्रीकरणासाठी नंदनवन ठरते आहे.   पुणे शहरापासून ५० किलोमीटरवर भोर हे संस्थानकालीन सुमारे २० हजार लोकवस्तीचं गाव असून निरानदी काठावर पंतसचिवांनी १७७० साली राजवाडा बांधला. सुमारे ४० हजार स्वेअर फुटाचे संपुर्ण लाकडी बांधकाम असून दरबार सभागृह, महल अशी ३५ दालने आहेत. नगारखाना उत्तम कठडे, झुंबरे आहेत. मुख्य दरबार सागवान लागडाचा सभामंडप भव्य प्रवेशव्दार हे चित्रपट व मालिकांसाठी तयार सेटसारखे आहेत. या शिवाय शिवापुर आळी गणेशपेठेतील घरे, जुने वाडे, भोरेश्वर मंदीर, पिसावरे येथील वाडा इंगवली गाव, खंडोबाचा माळ, निरादेवघर, ब्रिटीशकालीन दगडी भाटघर धरणाच्या भागातील निर्सगरम्य परिसर, राजा रघुनाथराव विद्यालयाची संस्थानकालीन दगडी इमारत, रामबाग येथील स्काऊटगाईडची इमारत, आंबवडे गावातील झुलता पुल, पांडव कालीन नागेश्वर मंदीर, बनेश्वर मंदीर व बाग, कारी येथील सरदार कान्होजी जेधेंचा वाडा, रोहिडा, रायरेश्वर किल्यांचा परिसर हि मालिका व चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीची प्रमुख ठिकाणे आहे१९५० च्या दशकात प्रथम दिलीपकुमार यांनी बैरागी चित्रपटाचे भोरला चित्रीकरण झाले. त्यानंतर दादा कोंडके यांनी इंगवली या आपल्या गावात स्टुडिओ उभारुन अनेक चित्रपटांचे चित्रीकरण केले. त्यानंतर राजकुमार संतोषी, बोनी कपुर, स्मिता तळवळकर, नितिन देसाई यांच्या अनेक चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण झाले. अमिताभ बच्चन, दिलीपकुमार, अक्षयकुमार, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपुर, गोविंदा, रणवीर कपुर, अनुपम खेर, मोहन आगाशे, निळु फुले, अशोक सराफ, डॉ. अमोल कोल्हे, संजय नार्वेकर, ऐश्वर्या राय, सुश्मिता सेन, डिंपल कापडिया, दिलीप प्रभावळकर, शिवाजी साटम, मकरंद अनासपुरे, अमीर खान, सिध्दार्थ जाधव, मेधा मांजरेकर यांनी चित्रीकरण केले आहे. तर दिपीका पदुकोण व रणवीर कपुर यांनी बाजीराव मस्तानी चित्रपटाचे चित्रीकरण याच राजवाडयात केले.   पुणे शहरापासुन जवळ असल्याने अनेक कलाकार पुण्यात राहून येऊन जाऊन चित्रीकरण करतात. निर्सगरम्य वातावरण आणि खर्च कमी प्रमाणात शिवाय राजवाडे, गडकोट किल्ले, पुरातन मंदिरे डोंगरदरे, घाट यामुळे सेट उभारण्याचा खर्च होत नसल्यामुळे निर्माते व दिग्दर्शकांचा कल भोरकडे असून अनेक चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण येथे होत आहे. यामुळे स्थानिक कालाकारांना काम व रोजगार मिळतो........................... दादा कोंडके यांचा स्टुडिओ मात्र दुर्लक्षित   मराठी चित्रपटांना खऱ्या अर्थाने भोरकडे आणणारे आणि चित्रपटाच्या माध्यमातून भोरचे नाव गिनिज बुकावर झळकवणारे दादा कोंडके यांच्या निधनानंतर त्यांच्या इंगवली गावातील दादा कोंडके स्टुडिओची वाईट अवस्था झाली आहे. याकडे लक्ष देण्याची गरज असून दादांचे स्मारक गावात करण्याची मागणी होत आहे.  

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाShootingगोळीबारbollywoodबॉलिवूड