पुण्यात राष्ट्रवादीकडून 'लाव रे तो ऑडिओ', ऐकवली मोदींची जुनी भाषणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 11:30 IST2022-04-29T11:24:36+5:302022-04-29T11:30:44+5:30
भाजपकडून देशात विकृत राजकारण- जगताप

पुण्यात राष्ट्रवादीकडून 'लाव रे तो ऑडिओ', ऐकवली मोदींची जुनी भाषणं
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांवरून राजकारण तापत असल्याचे दिसते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मस्जिदीवरील भोंगे काढा नाही तर आम्ही तिथं हनुमान चालिसा लावू, असा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यात भोंग्यांवरून राजकारण होताना दिसतेय. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुडलक चौकात 'भोंगा आंदोलन' पार पडले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यावेळी म्हणाले, धर्मांधतेच्या भोंग्यांना आम्हाला विकासाच्या भोंग्यांनी उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न आहे'.
पुढे बोलताना जगताप म्हणाले, गेल्या आठ वर्षापासून देशात मोदी सरकार आहे. या काळात देशात महागाईचा आणि बेरोजगारीचा उच्चांक मोडला आहे. केंद्र सरकार चतुराईने लोकांचे लक्ष धर्माकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप राज ठाकरे, योगी आदित्यनाथ, अमित शहांना पुढे करून देशात विकृत राजकारण करत आहेत.
या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जुनी भाषणे ऐकवण्यात आली. या आंदोलनात महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणात आहे.