शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पाडले बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 18:45 IST

प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे. 

ठळक मुद्दे१०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय पुण्याला पाणी नेऊ देणार नाहीकाम बंद करणे हाच शेवटचा पर्याय भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य होत नसल्याचे चित्र

आंबेठाण : भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल व जलवाहिनीचे काम आज ( दि. ७) रोजी दुपारी बंद पाडले.गेली कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत शासनाकडून कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच भविष्यातही आपल्या मागण्या मान्य होणार नसल्याचे लक्षात आल्यानेच हे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.    भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या मागण्या मान्य होत नसल्याचे चित्र दिसत असल्याने प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आज ( दि.७) करंजविहिरे येथे बैठक घेतली. यावेळी जॅकवेल व जलवाहिनीचे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी लक्ष्मण पासलकर म्हणाले, काम बंद करणे हाच शेवटचा पर्याय असून,१०० टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय पुण्याला पाणी नेऊ देणार नाही.याच सभागृहात आमदारांनी शब्द दिला होता. प्रत्येक खातेदाराला खेड तालुक्यातील जमीन मिळाली पाहिजे. मात्र अजून एकही धरणग्रस्त शेतकऱ्याला जमिनी मिळाल्या नाहीत.पहिल्यांदा आमचे प्रश्न सोडवा अन् मग खुशाल पुण्याला पाणी द्या.. पण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही याप्रमाणे जॅकवेल आणि जलवाहिनीचे काम बंद केल्याशिवाय शासनाचे डोळे उघडणार नाहीत, असे बैठकीत ठरल्याने आजपासून काम बंद करण्यात आले आहे.आता आम्हाला अटक करायची तर खुशाल करा आता आम्ही मागे हटणार नसल्याचे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले, असे उपस्थित धरणग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.  यावेळी महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे सरचिटणीस लक्ष्मण पासलकर,पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, सत्यवान नवले,देवीदास बांदल,गजानन कुडेकर,संदीप देशमुख,सुदाम शिंदे,किसन नवले,गणेश जाधव,पंडित मरगज यांच्यासह जवळपास एक हजार प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दहिफळे, उपनिरीक्षक विक्रम पासलकर,मणेर,खाडे या पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस अधिकारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

टॅग्स :KhedखेडDamधरणFarmerशेतकरीWaterपाणीPuneपुणेPoliceपोलिस