इंग्लंड-दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा, ४० लाख रुपये जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 08:35 IST2023-10-23T08:34:04+5:302023-10-23T08:35:54+5:30

त्याच्याकडून रोख ४० लाख ८० हजार रुपये जप्त केले. ही कारवाई शनिवारी (दि. २१) काळेवाडी येथे करण्यात आली...

Betting on England-South Africa cricket match, Rs 40 lakh seized pune crime news | इंग्लंड-दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा, ४० लाख रुपये जप्त

इंग्लंड-दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा, ४० लाख रुपये जप्त

पिंपरी : सध्या सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट सामान्यांमधील इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून रोख ४० लाख ८० हजार रुपये जप्त केले. ही कारवाई शनिवारी (दि. २१) काळेवाडी येथे करण्यात आली.

दिनेश हरीश शर्मा (वय ३८, रा. काळेवाडी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक एच. व्ही. माने यांना माहिती मिळाली की काळेवाडीतील आदी आम्मा ब्लीस सोसायटी येथील प्लॅट ७०१ मध्ये एकजण ‘क्रिकेट लाईव्ह लाईन गुरू’ या सोशल मिडिया ॲपद्वारे बेटिंग घेत आहे.

त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत दिनेश याला ताब्यात घेतले. तो धनू आणि शिवन यांच्याकडे इंग्लंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातील क्रिकेट सामान्यावर हाई लागई नावाचा क्रिकेट बेटींग हा जुगार खेळत असताना मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून ४० लाख रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि एक कल्युलेट असा एकूण ४० लाख ८० हजार १०० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. संशयित दिनेश आणि धनू आणि शिवन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Betting on England-South Africa cricket match, Rs 40 lakh seized pune crime news