शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागात जुळवाजुळव सुरू

By admin | Updated: October 10, 2016 01:36 IST

महापालिकेची प्रभागरचना शुक्रवारी झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी मिळण्यापूर्वीच थेट प्रचाराला सुरुवात करण्याची चाचपणी करण्यात येत

पुणे : महापालिकेची प्रभागरचना शुक्रवारी झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी मिळण्यापूर्वीच थेट प्रचाराला सुरुवात करण्याची चाचपणी करण्यात येत आहे. चार सदस्यीय प्रभाग मोठा असल्याने खूप कमी वेळात त्यांना घरा-घरापर्यंत पोहोचण्याची कसोटी पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे नव्या भागातील कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, बैठका, सोशल मीडियावरील प्रचार यांना वेग आला आहे.आगामी महापालिकेची निवडणूक मार्च २०१७ मध्ये होणार आहे, त्यासाठी अवघा ५ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. जानेवारी महिन्यामध्ये निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता जाहीर करून निवडणुका कार्यक्रम घोषित केला जाणे अपेक्षित आहे. यंदा पहिल्यांदाच ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका पार पडत आहेत. एक प्रभाग हा ७० ते ८५ हजार लोकसंख्येचा आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रभागरचना आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान इच्छुक उमेदवारांसमोर असणार आहे.प्रभागरचनेचे चित्र स्पष्ट होण्यापूर्वी निवडणुकीची तयारी करण्यामध्ये उमेदवारांना अनेक अडचणी येत होत्या. इच्छुक उमेदवारांनी गणेशोत्सवात मंडळांवर मोठ्या प्रमाणात देणग्यांची खैरात केली. मात्र संबंधित गणेश मंडळाचे कार्यकर्ते नवीन प्रभागात असणार का, अशी धाकधूक त्यांना वाटत होती. अखेर शुक्रवारी प्रभागरचनेवरचा पडदा उठला. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार व निवडणूक विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी नवीन प्रभागरचनेचा आराखडा, प्रभागांच्या चतु:सीमा व नकाशे प्रसिद्ध केले. काहींसाठी प्रभागरचना सुखद ठरली तर काहींना त्यामुळे मोठे हादरे बसले आहेत. या धक्क्यांमधून सावरत आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.उमेदवारांनी सर्वांत पहिल्यांदा नव्याने समाविष्ट झालेल्या भागांमध्ये भेटीगाठी देण्यावर भर दिला आहे. नव्या भागात कार्यरत असलेले पक्षाचे कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करणे, त्या भागातील नातेवाई, मित्र परिवार यांना प्रचारासाठी तयार करणे, बैठका घेणे यावर उमेदवार भर देत आहेत. सकाळच्या मॉर्निंग वॉकपासून उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात होत आहे. विद्यमान नगरसेवकांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. बहुतांश विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी फिक्स असल्याने ते जोरदारपणे प्रचाराला लागले आहेत. तिकीट मिळेल की नाही याची धाकधूक मनात ठेवून अनेक इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौज उभी करण्यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. त्यामुळे निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यापूर्वीच प्रचारात रंग भरू लागला आहे. (प्रतिनिधी)

सोशल मीडियावर भर-

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून प्रयत्न केले आहेत. राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर वाढवावा यासाठी विशेष शिबिरे घेण्यात आली. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या प्रचारासाठी विशेष नेमणुका केल्या आहेत.

फ्लेक्सबाजीला उधाण-सण, उत्सव, कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरामध्ये अधिकृत-अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग उभे राहणे नवीन नाही. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याला आणखीनच उधाण आले आहे. इच्छुक उमेदवारांचे वाढदिवस, कौटुंबिक समारंभ दणक्यात पार पडू लागले आहेत.

मतदार नोंदणीवर जोर-महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदार नोंदणी मोहीम येत्या १४ आॅक्टोबरपर्यंत राबविली जाणार आहे. जास्तीत जास्त नवमतदारांचे मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यावर आजी-माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवार यांच्याकडून भर दिला जात आहे. त्यांना अर्ज भरण्यापासून सर्व प्रकारची मदत केली जात आहे.