बारामतीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार; मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 20:02 IST2025-03-05T20:01:48+5:302025-03-05T20:02:05+5:30

स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे

beed sarpanch murder case Jan Aakrosh Morcha to be held in Baramati; Decision taken in Maratha Kranti Morcha meeting | बारामतीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार; मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय

बारामतीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार; मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय

बारामती  - बारामती शहरात शनिवारी(दि ८) जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. स्व.संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर बारामतीत त्याचे तीव्र पडसाद उमटले.मराठा समाजाने या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येथील जिजाऊ भवन येथे  तातडीने बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी मोर्चाच्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने याबाबत अधिक माहिती देण्यात आली. स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी बैठकीसाठी मराठा समाज मोठ्या संख्येने उपस`थित होता.सर्वानाच संतोष देशमुख यांच्या क्रुर हत्येचे प्रचंड दु:ख झाले आहे,झालेले दु:ख आणि वेदना तीव्र आहेत.

या पार्श्वभुमीवर बारामतीत शनिवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चात सर्व जातीधर्माचे नागरीक सहभागी असणार आहेत.आज आपल्या एका भावावर हि वेळ आली आहे.त्यामुळे आपल्या कुटुंबियांसह समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी ८ वाजता मोर्चा सुरु होणार आहे.कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानापासून मोर्चाला सुरवात होइल.संतोष देशमुख यांच्या हत्येचे दु:ख झालेले सर्व जाती धर्माचे  नागरीक मोर्चात सहभागी होतील.मोर्चा नेहमीच्या मार्गाने भिगवण चाैक येथे दाखल होइल.यावेळी समाजातील केवळ दोन मुली मोर्चामध्ये मनोगत व्यक्त करतील.त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपुुर्ण प्रशासनाचा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त केला जाइल.देशमुख यांना श्रध्दांजली अर्पण करुन प्रांताधिकारी यांना निवेदन दिले जाइल.त्यानंतर मोर्चाची सांगता होइल.दुपारपर्यंत शहर कडकडीत बंद राहिल,याची खबरदारी सर्वांनी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: beed sarpanch murder case Jan Aakrosh Morcha to be held in Baramati; Decision taken in Maratha Kranti Morcha meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.