शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांच्या जागरूकतेमुळे ‘तो’ परतला कुटुंबात

By admin | Updated: July 2, 2017 02:12 IST

सांगवी, तालुका बारामती येथील एसटी बसस्थानकावर सापडलेला सातारा येथील अल्पमतीमंद मुलगा तरुणांच्या जागरूकतेमुळे व पोलिसांच्या

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगवी : सांगवी, तालुका बारामती येथील एसटी बसस्थानकावर सापडलेला सातारा येथील अल्पमतीमंद मुलगा तरुणांच्या जागरूकतेमुळे व पोलिसांच्या मदतीमुळे त्याच्या घरी सुखरूप पोहोचला.
सागर संजय जाधव (वय १६, रा. भुर्इंज, ता. वाई, जि. सातारा) हा अल्पमतिमंद मुलगा त्याच्या घरी ३-४ दिवसांपूर्वी एका व्यक्तीचे निधन झाले होते. यावेळी घरचे सर्व त्यातच व्यस्त होते. याच संधीचा फायदा घेत तो अचानकपणे घरी कोणालाही काही न सांगता नजर चुकवून घरातून निघून गेला. एक सॅक त्यामध्ये बूट ,कपडे ,आणि एक मोबाईल घेऊन तो एसटीने प्रवास करीत सांगवीच्या बसस्थानकावर उतरला असता, तो तेथील काही तरुणांना भेटला असता त्यांच्याशी त्याच्या संवाद साधू लागला, त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हते, त्याच्याकडील बॅग पाहून त्यावेळी त्या तरुणांना तो एखाद्या आश्रमशाळेतून पळून आला असेल, असा संशय वाटू लागला, तरुणांनी त्याची विचारपूस केली, त्याला लिहिता वाचता येत नव्हते, त्याच्या कडे काही तिकीटे आढळून आली. मी माझ्या मामाच्या घरी निघालो आहे, इथे कारखाना कुठे आहे, असे तो त्याच्या बोबड्या भाषेत विचारपूस करू लागला.
बोलता बोलता तो खोटे बोलू लागला. तर त्याचा मामा व नातेवाईक तिथे कोणीच नव्हते, यामुळे त्याचा संशय आला की तो पळून आला आहे, तो आणखी कुठे जाऊन काही अनर्थ होऊ नये या हेतूने वैभव बाळासाहेब जगताप, ऋषीकेश जालिंदर शिंदे, कपिल बापूसोा जगताप व
काही तरुणांनी त्याला माळेगाव पोलीस स्टेशनला सूपूर्त  केले, माळेगाव दुरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल शरद वारे यांनी  अथक प्रयत्नांनंतर त्याच्या आईचा शोध लावला. त्याच्या आईला फोन करून माहिती कळवली असता, त्याची आई माळेगाव पोलीस स्टेशनला काही तासांत पोहचली व वारे यांनी सागर याला त्याच्या आईच्या हवाली केले.  घरात कोणालाही काहीही न सांगता निघून आलेल्या अल्पमतिमंद मुलाला सांगवीतील तरुणांच्या व पोलिसांच्या मदतीने त्याला
त्याच्या आईची भेट
करून दिली.