शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

आजीच्या गर्भाशयातून नातीचा जन्म, 'ही' ठरली देशातील पहिलीच कन्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 1:54 PM

पुण्यातील गॅलेक्सी केयर हॉस्पिटलमधे या मुलीचा जन्म झाला आहे. तिचे वजन 1450 ग्राम असून आई आणि तिची तब्येत ठणठणीत आहे. मीनाक्षी बालंद (28 वर्षे) असे आईचे नाव असून त्या बडोदा येथील आहेत.

पुणे - प्रत्यारोपण केलेल्या गर्भाशयातून देशातील पहिल्या चिमुकलीचा दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर जन्म झाला. जगातील हे बारावे बाळ ठरले आहे. विशेष म्हणजे जन्माला आलेली मुलगी तिच्या आजीच्या गर्भाशयातून जन्माला आली आहे. म्हणजे जन्म दिलेल्या आईला तिच्या आईने आपले गर्भाभय दिले होते. त्यामुळे ही जननप्रकिया पार पडली. जन्मलेलं बाळ आणि तिची आई सुस्थितीत आहे.

पुण्यातील गॅलेक्सी केयर हॉस्पिटलमधे या मुलीचा जन्म झाला आहे. तिचे वजन 1450 ग्राम असून आई आणि तिची तब्येत ठणठणीत आहे. मीनाक्षी बालंद (28 वर्षे) असे आईचे नाव असून त्या बडोदा येथील आहेत. लग्नानंतर विविध कारणामुळे त्यांचा तीनवेळा गर्भपात झाला होता. त्यातच त्यांचे गर्भाशय निकामी झाल्याने पुन्हा आई होण्याची त्यांची आशा मावळली होती. पण, आई होण्याची आस त्याना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांना मूल दत्तक घेणे व सरोगासीचा पर्याय होता. पण, त्यानी ते नाकारुन गर्भाशय प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. मुलीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची आई सुशीलाबेन (वय 48) यांनी आपले गर्भाशय देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार 17 मे 2017 रोजी प्रत्यारोपण करण्यात आले, अशी माहिती गॅलेक्सीचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुनताम्बेकर यांनी दिली.

प्रत्यारोपित गर्भाशय व्यवस्थित काम करू लागल्याने प्रयोगशाळेत तयार केलेला गर्भ मार्च महिन्यात गर्भाशयात सोडण्यात आला. गर्भधारणाही  यशस्वीपणे झाली. तेव्हापासून मीनाक्षी या रुग्णालयातच आहेत. आई व बाळाच्या प्रत्येक हालचालीवर डॉक्टर लक्ष ठेउन होते. बुधवारी रात्री गर्भाशायातील पाण्याची पातळी कमी होत चालल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने सिझेरिन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी गोंडस मुलीचा जन्म झाला. ज्या गर्भाशयातून तिच्या आईचा जन्म झाला, त्याच गर्भाशयातून तिचाही जन्म झाला आहे. 

जगात 27 गर्भाशय प्रत्यारोपणआतापर्यंत जगात 27 गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याद्वारे 9 स्विडन आणि अमेरिकेत 2 अशा एकुण 11 मुलांचा जन्म झाला आहे. गॅलेक्सीमधील मुलगी जगातील  12 वी तर भारतातील पहिली ठरली आहे. रुग्णालयात एकूण सहा प्रत्यारोपण झाले आहेत. यातूनही यशस्वीपने बाळ जन्माला येइल, अशी आशा डॉ. पुणताम्बेकर यांनी व्यक्त केली.

आईला अत्यानंद मुलीला जन्म दिल्याबद्दल तिची आई मीनाक्षी यानी आनंद व्यक्त केला. गर्भाशय निकामी झाल्याने आई होणाची आशा मावळली होती. पण, आता खुप आनंद होतोय. आईने गर्भाशय दिल्याने हे शक्य झाले, अशी भावना त्यानी व्यक्त केली.  

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटल