पोलिसाची पत्नीला पट्ट्याने मारहाण; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 18:40 IST2022-11-05T18:38:31+5:302022-11-05T18:40:01+5:30

पत्नीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे...

Beating policeman's wife with a belt; Shocking incident in Pune | पोलिसाची पत्नीला पट्ट्याने मारहाण; पुण्यातील धक्कादायक घटना

पोलिसाची पत्नीला पट्ट्याने मारहाण; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : विवाहबाह्य संबंध ठेवून त्याबाबत विचारणा करणाऱ्या पत्नीला पट्ट्याने मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप हिरामण खंडागळे (वय ३०, रा. देवी लाईन, जेल वसाहत, येरवडा) असे या पोलीस शिपायाचे नाव असून, ताे येरवडा वाहतूक विभागात नेमणुकीला आहे. याबाबत त्याच्या पत्नीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २०१९ पासून सुरू होता.

अधिक माहितीनुसार, संदीप खंडागळे याचा कारागृहात पोलीस शिपाई असलेल्या फिर्यादीबरोबर लग्न झाले आहे. त्यांना लग्नात आलेले स्त्रीधन संमतीशिवाय परस्पर बँकेत तारण ठेवले. पालघर येथील महिला पोलीस शिपायाबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवले. त्याबाबत विचारणा केली असता फिर्यादीला शिवीगाळ व मारहाण केली. फिर्यादी गरोदर असताना बेल्टने मारहाण केली. फिर्यादीचा पगार स्वत:च्या खात्यावर जमा करून मानसिक व शारीरिक छळ केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक काटे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Beating policeman's wife with a belt; Shocking incident in Pune