पिंपरीतील डांगे चौक येथे वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 15:53 IST2019-09-26T15:52:34+5:302019-09-26T15:53:08+5:30

तुझी लायकी नाही आमची गाडी थांबवायची व कारवाई करायची, असे म्हणत शिवीगाळ केली...

beaten up to Traffic police at Dange Chowk in Pimpri | पिंपरीतील डांगे चौक येथे वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

पिंपरीतील डांगे चौक येथे वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

पिंपरी : डांगे चौक येथे वाहतूक नियमन करत असताना दोन व्यक्तीने तिथे येऊन फिर्यादी यांच्याशी हुज्जत घातली. तसेच शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. ही घटना बुधवारी (दि. २५) थेरगाव येथील डांगे चौकात घडली.
याप्रकरणी बाबासाहेब रामचंद्र पावसकर (पोलीस नाईक २३९, हिंजवडी वाहतूक विभाग) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विजय तुलसीदास शिरसाट (वय ३८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), किरण सोनाजी राठोड (वय २४, रा. ताथवडे) यांना अटक करण्यात आली आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबासाहेब हे डांगे चौकामध्ये वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी आरोपी मोटारसायकल ( एमएच १३ एक्यु १८७७) घेऊन विरुद्ध बाजूने आले. त्यांना बाबासाहेब यांनी हटकले असता आरोपींनी त्यांच्याशी हुज्जत घालून धक्काबुकी केली. तसेच तुझी लायकी नाही आमची गाडी थांबवायची व कारवाई करायची, असे म्हणत शिवीगाळ केली. तुला बघून घेतो, तु येथे कसा नोकरी करतो. तुझी वर्दीच उतरवतो असे म्हणत धमकी दिली. याबाबत सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Web Title: beaten up to Traffic police at Dange Chowk in Pimpri