शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

बारामती महिला रुग्णालयाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:10 IST

बारामती : कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी उद्योगासह सामाजिक संस्थेच्यावतीने महिला रुग्णालयाला रुग्णवाहिका भेट देण्यात आली. रुग्णवाहिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार ...

बारामती : कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी उद्योगासह सामाजिक संस्थेच्यावतीने महिला रुग्णालयाला रुग्णवाहिका भेट देण्यात आली. रुग्णवाहिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे लोकार्पण करण्यात आले.

बारामती परिसरातील आरोग्य सेवेला मदत करण्यासाठी बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजने आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत डिमेक फाउंडेशन पुणे व डेक्कन मेकॅनिकल आणि बारामती येथील केमिकल कंपनी (डिमेक)च्या वतीने सुसज्ज रुग्णवाहिका उपमुख्यमंत्री पवार यांचे हस्ते महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई यांचेकडे सुपुर्द करण्यात आली.

या वेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे ,एमआयडीसी उपअभियंता शुभम पाटील, डॉ. सदानंद काळे, डिमेक कंपनीचे वरिष्ठ महाप्रबंधक युवराज काळे, उपमहाप्रबंधक नीलेश आंदळकर, संभाजी होळकर, उद्योजक सचिन सातव, बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार उपस्थित होते.

या उपक्रमाबद्दल डिमेक नातू फाउंडेशन व डिमेक कंपनीच्या चेअरमन प्रभा नातू व डिमेक कंपनी उपाध्यक्ष नागेश कोरे यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

बारामती महिला रुग्णालयासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रुग्णवाहिका सुपुर्द करण्यात आली.

११०५२०२१ बारामती—०१