बारामतीचा तिढा सैल होण्याची आशा; फडणवीस-ठाकरे यांच्यासमवेत आज जानकर यांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 01:52 AM2019-03-14T01:52:53+5:302019-03-14T01:54:03+5:30

संपूर्ण देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे. भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही ,तर महादेव जानकर देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कपबशीच्या चिन्हावर लढण्यासाठी ठाम आहेत.

Baramati trio hopes to be loose; Talking about Fadnavis-Thackeray today, | बारामतीचा तिढा सैल होण्याची आशा; फडणवीस-ठाकरे यांच्यासमवेत आज जानकर यांची चर्चा

बारामतीचा तिढा सैल होण्याची आशा; फडणवीस-ठाकरे यांच्यासमवेत आज जानकर यांची चर्चा

Next

बारामती : संपूर्ण देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीचे चित्र अद्याप अस्पष्टच आहे. भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही ,तर महादेव जानकर देखील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कपबशीच्या चिन्हावर लढण्यासाठी ठाम आहेत. या पार्श्वभुमीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि १४) मुंबईत जानकर यांंना निमंत्रण दिले आहे. त्यापाठोपाठ शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सुध्दा जानकर यांना चर्चेसाठी बोलावले असल्याचे रासपच्या सुत्रांनी सांगितले. या बैठकीत बारामतीच्या राजकीय तिढा सैल होण्याची रासपला आशा आहे.

लोकसभा निवडणुक पक्षाचाच उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली खरी. मात्र, भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविणारा भाजपचाच उमेदवार द्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मागील मागील महिन्यातच तशी घोषणा केली आहे. दुसरीकडे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर या मतदारसंघातुन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कपबशीच्या चिन्हावर लोकसभा लढविण्यावर ठाम आहेत. रासपच्या कार्यकर्त्यांनी त्याप्रमाणे तयारी देखील सुरु केली आहे. दुसरीकडे भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत कधी नव्हे एवढी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दौंडचे आमदार अ‍ॅड राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे. शिवाय बारामती लोकसभेसाठी आता भाजपमधून बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, दिलीप खैरे, भीमराव तापकीर, वासुदेव काळे यांच्याबरोबर खुद्द आमदार राहुल कुल, पृथ्वीराज जाचक यांचे देखील नाव चर्चेत नव्याने आले आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

राज्यातील महायुतीचा घटकपक्ष म्हणून बारामती लोकसभेच्या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचाच हक्क आहे. पक्षाचे वतीने राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची या जागेची आग्रही मागणी आहे,असे रासप चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दांगडे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

यासंदर्भात रासपचे प्रमुख जानकर यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निमंत्रण दिले आहे.गुरुवारी मुख्यमंत्र्यासमवेत बारामतीच्या जागेबाबत तोडगा निघेल,याबाबत रासप आशावादी आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी देखील जानकर यांना चर्चेसाठी बोलावल्याचे दांगडे पाटील म्हणाले.

Web Title: Baramati trio hopes to be loose; Talking about Fadnavis-Thackeray today,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.