शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बारामती-फलटण-लोणंद लोहमार्ग: भूसंपादनास एकरी ४८ लाख मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:09 IST

तालुक्यातील ४०० एकर जमिनीचे होणार संपादन

बारामती : बारामती-फलटण-लोणंद हा लोहमार्ग एकूण ६७ किमी लांबीचा आहे. त्यापैकी बारामती तालुक्यातून ३७ किमीचा लोहमार्ग जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील ४०० एकर जमिनी संपादन होणार आहेत. एकरी ४८ लाख रुपये भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी ११५ कोटी रुपये रेल्वे प्रशासनाकडून मिळाले आहेत. केंद्र सरकारकडून ११० कोटी रुपये भूसंपादनासाठी मिळणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.बारामती-फलटण-लोणंद या नवीन होणाºया लोहमार्गाची भूसंपादन व खरेदी दस्त प्रक्रिया ३१ आॅक्टोबर २०१८ पासून सुरू करण्यात आली आहे. या भूसंपादनाबाबतच्या प्रक्रियेची सुरुवात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या उपस्थितीत दुय्यम निबंधक कार्यालयात येथे लाटे माळवाडी या गावातील दिनकर मारुती नाळे यांच्या जमिनीचे खरेदी दस्त करून करण्यात आली. यावेळी तहसीलदार हनुमंत पाटील, दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते.यावेळी बोलताना निकम म्हणाले, की या लोहमार्गामध्ये बारामती तालुक्यातील लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगळवाडी, बºहाणपूर, कटफळ, नेपतवळण, सोनकसवाडी, ढाकाळे, थोपटेवाडी, कºहावागज, सावंतवाडी, तांदूळवाडी या गावांचा समावेश आहे. या मार्गावर तीन स्टेशन होणार असून हा लोहमार्ग एकूण ६७ किलोमीटरचा आहे. नेपतवळण, ढाकाळे, लाटे या ठिकाणी रेल्वे स्टेशन विकसित करणत येणार आहेत. या लोहमार्गापैकी ३७ किलोमीटरएवढा परिसर बारामती उपविभागाच्या हद्दीमध्ये आहे. या ३७ किलोमीटर परिसरामध्ये एकूण ४०० एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या कामासाठी २२५ कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी रेल्वे विभागाकडून ११५ कोटी रुपये प्राप्त झाले असून केंद्र सरकारकडून ११० कोटी रुपये मिळणार आहेत. भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनी खासगी वाटाघाटीने खरेदी करण्यात येणार आहेत.जमिनीची रक्कम तात्काळ बँक खात्यात होणार जमाजमिनीची रक्कम तत्काळ संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. भूसंपादन केलेल्या सर्व जमिनी येत्या मार्चअखेरपर्यंत ताब्यात घेण्यात येणार आहेत. भविष्यात बारामती रेल्वे स्टेशन जंक्शन होणार आहे. या लोहमार्गामुळे नागरिकांची वेळेची व पैशांची बचत होऊन मालवाहतुकीस व शेतकºयांनाही मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. तसेच आज दिवसभरात एकूण ६५ खरेदी दस्तांचे कामकाज करण्यात येणार असल्याचे निकम यावेळी म्हणाले.बारामती-फलटण-लोणंद लोहमार्गाच्या बारामती तालुक्यातील ३७ किमी अंतरामध्ये १ हजार २०० बाधितांना मोबदला मिळणार आहे. यामध्ये घर, शेती, झाडे, विहिरी, विंधन विहिरी यांचा समावेश आहे. या बैठकीवेळी काही गावांतील ग्रामस्थांनी भूसंपादनाला विरोध दर्शवला. मात्र या लोहमार्गामुळे पुणे स्टेशनवरील बराचसा ताण कमी होणार आहे. दौंडहून थेट बारामतीमार्गे रेल्वेने दक्षिण भारताशी जोडला जाणार आहे.

टॅग्स :Baramatiबारामती