शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Baramati Nagar Parishad: 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये बारामती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 19:49 IST

हे राज्यस्तरीय यश महाराष्ट्र अजित पवार यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे फलित असल्याचे नमूद करण्यात आले आहे

बारामती : “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत भूमी, जल, वायु, अग्नी व आकाश या पंचतत्त्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ४० हजार ते १ लाख लोकसंख्या गटामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत बारामती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बारामती नगरपरिषदेचा सन्मान “माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळ्या”त करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा शनिवारी (दि २१) दुपारी १२.०० वाजता डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे राज्यस्तरीय यश महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे फलित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या प्रेरणेने नगरपरिषद प्रशासनाने पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाच्या दिशेने भरीव कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती नगर परिषदेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

या यशाबाबत नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले कि, माझ्या बारामती शहराची देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये गणना झाली पाहिजे. हे ‘अजितदादां’चे स्वप्न होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राबविलेल्या विविध उपक्रमांचे हे मोठे यश आहे. आज ‘दादां’च्या बारामतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविलेले यश पाहण्यासाठी तेच आपल्यात नाहीत. याची खुप मोठी खंत बारामतीकरांमध्ये आहे.‘दादां’वर खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्या बारामतीकरांचे यामध्ये मोठे योगदान आहे. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या नकाशावर बारामतीची ओळख करण्यासाठी आम्ही बारामतीकर सज्ज आाहोत.‘दादां’ना अभिप्रेत असणारे देशातील शहर घडविण्यासाठी आम्ही सर्वजण कटीबध्द आहोत, असे सातव म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Nagar Parishad Secures Top Rank in 'Majhi Vasundhara Abhiyan 5.0'

Web Summary : Baramati Municipal Council secured first place in 'Majhi Vasundhara Abhiyan 5.0' among cities with 40,000-100,000 population. The award recognizes outstanding work in environmental conservation. The council dedicates the award to the late Ajit Pawar's vision for Baramati.
टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारenvironmentपर्यावरणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार