शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बारामती दूध संघाचे नामांतर; 'सहकारमहर्षी अजितदादा पवार सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित' नाव निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:10 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती दूध संघाचे कामकाज सुरु होते, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संघाची नेहमीच उत्तरोउत्तर प्रगती झाली

बारामती: कात्रज दूध संघाच्या निर्णयानंतर आता बारामती तालुका दुध उत्पादक संघाने संचालक मंडळाच्या बैठकीत महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. संस्थेच्या नावाचे नामांतर करण्यात आले. बारामती दुध संघ आता सहकार महर्षी अजितदादा पवार सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित या नावाने ओळखला जाणार आहे.याबाबत संघाचे चेअरमन संजय रामचंद्र कोकरे, व्हा.चेअरमन दत्तात्रय सदाशिव वावगे यांनी माहिती दिली. यावेळी संघाचे सर्व संचालक मंडळ, संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश राणे, उपमहाव्यवस्थापक अमोल चव्हाण उपस्थित होते. 

अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती दूध संघाचे कामकाज सुरु होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संघाची नेहमीच उत्तरोउत्तर प्रगती झाली. संस्थेने विविध प्रकल्प उभारले. दुधउत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी नेहमीच पाठबळ दिले. सहकार क्षेत्राला त्यांनी दिलेलं बळ मोलांच आहे. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी याकरिता संचालक मंडळाच्या बैठकीत बारामती दूध संघाचे नांव सहकारमहर्षी अजितदादा पवार सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, असे करण्यात आले आहे.

संघाचे पॅकींग दूध व दूग्धजन्य पदार्थ "नंदन" ब्रँडने विविध शहरांमध्ये विकी होते. पॅकींग दूध, पुणे, लोणावळा, अहिल्यानगर, संभाजीनगर, मुंबई, रोहा, महाड, सोलापूर या विविध शहरामध्ये विक्री होते. तसेच पुणे व मुंबई येथील नामांकित हॉटेल्स्, कार्पोरेट ऑफिस, विविध नामांकित कंपन्या, हॉस्पीटल्स् इत्यादी ठिकाणी नंदन पाऊच पॅकींग दूध व दूग्धजन्य पदार्थाची विक्री केली जात आहे. संघामार्फत शेतकर्यांच्या दुधाचे दूग्धजन्य पदार्थामध्ये सध्या श्रीखंड, आम्रखंड, पनीर, दही, ताक, लस्सी, तूप, बासुंदी, पेढा, कलाकंद, खवा इत्यादी दुग्धपदार्थाचे उत्पादन घेतले जात आहे. संघाच्या दूग्धपदार्थाला ग्राहकांची चांगली पसंती असून मोठया प्रमाणावर मागणी आहे. संघाच्या दूध उत्पादक शेतक-यांसाठी योग्य व वाजवी किंमतीत नंदन सुप्रिम, नंदन गोल्ड, नंदन गोल्ड प्लस, नंदन सिलव्हर, नंदन काफस्टार्टर, नंदन गर्भसत्व इत्यादी पशुखाद्य तसेच नंदन मिल्कमीन मिनरल मिक्चर), इत्यादी प्रकारचे दर्जेदार उत्पादने विक्रीसाठी बाजारात आणली.

कात्रजला  'अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज’

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (कात्रज) ला 'अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज’, असे नामकरण करण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळाने सर्वानुमते घेतला आहे. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने सहकार क्षेत्रात शोककळा पसरली असून, ही हानी सहकार चळवळीच्या दृष्टीने आणि पुणे जिल्ह्यातील दूध संघासाठी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना संघाने व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Milk Union Renamed After Ajit Pawar as Tribute

Web Summary : Baramati Milk Union is now named after Ajit Pawar to honor his contributions. The union produces 'Nandan' brand dairy products. Katraj Dairy has also been renamed in his honor, recognizing his impact.
टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारMilk Supplyदूध पुरवठाPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसkatrajकात्रज