बारामतीत दिवसभर संततधार

By Admin | Updated: July 23, 2014 23:24 IST2014-07-23T23:24:11+5:302014-07-23T23:24:11+5:30

ब:याच दिवसांनी बारामती शहर आणि परिसरात बुधवारी (दि. 23) मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.

Baramati has a long life | बारामतीत दिवसभर संततधार

बारामतीत दिवसभर संततधार

बारामती : ब:याच दिवसांनी बारामती शहर आणि परिसरात बुधवारी (दि. 23) मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. दिवसभर संततधार पावसाच्या सरी शहर व परिसरामध्ये बरसत होत्या. त्यामुळे शेतक:यांबरोबरच  सर्वसामान्य नागरिकही सुखावले आहेत. 
अनेक दिवसांच्या प्रतिक्ष्ेानंतर एकदाचं ‘नभ उतरू आलं’ अशाच   सर्वसामान्यांच्या    भावना  होत्या. मात्र  अद्यापही  पेरणीसाठी तालुक्यातील शेतक:यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा  आहे. (वार्ताहर)
 
4बारामतीसह परिसरात बुधवारी झालेल्या पावसाने नागरिकांची मात्र चांगलीच त्रेधा उडवली. विद्यार्थी, कामानिमित्त आलेले बाहेरगावाचे नागरिक, फेरीवाले आणि अगदी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनासुद्धा या पावसाने सुखद धक्का दिला. 
4शहर व परिसरात झालेल्या या मध्यम स्वरूपाच्या या पावसाने शेतीसाठी फारसा फायदा होणार नाही. 
4या पावसाने शेतकरी सुखावला हे मात्र निश्चित. त्यातच 
निरा डाव्या कालव्यात वीर धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा 
प्रश्न काही प्रमाणात तरी सुटण्याची आशा आहे. 
4दरम्यान या संततधार पावसामुळे माळरानावर गवत 
उगवण्यास मदत होणार असून काही प्रमाणात का होईना चा:याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

 

Web Title: Baramati has a long life