बारामतीतील उद्योजक अडचणीत, अनेक कंपन्यांना टाळे ठोकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:17 AM2018-02-09T01:17:35+5:302018-02-09T01:17:37+5:30

मोठ्या कंपन्यांनी उत्पादन घटविल्याने बारामती एमआयडीसीमधील लघुउद्योजक अडचणीत आले आहेत. या एमआयडीसीत साधारणत: ७०० ते ८०० लघुउद्योग आहेत.

Baramati entrepreneurs in crisis, many companies have time to halt | बारामतीतील उद्योजक अडचणीत, अनेक कंपन्यांना टाळे ठोकण्याची वेळ

बारामतीतील उद्योजक अडचणीत, अनेक कंपन्यांना टाळे ठोकण्याची वेळ

Next

बारामती : मोठ्या कंपन्यांनी उत्पादन घटविल्याने बारामती एमआयडीसीमधील लघुउद्योजक अडचणीत आले आहेत. या एमआयडीसीत साधारणत: ७०० ते ८०० लघुउद्योग आहेत. मात्र, सध्या फक्त २०० ते ३०० लघुउद्योग सुरू असल्याचे चित्र आहे. मोठ्या कंपन्यांचे उत्पादक ३० ते ३५ टक्क्यांनी घटले आहे.
बारामती एमआयडीसीमध्ये सर्व सोयीसुविधा असल्याने मोठ्या कंपन्यांबरोबरच अनेक लघुउद्योग सुरू करण्यात आले. मागील दोन वर्षांपासून मात्र या उद्योगांना घरघर लागली आहे. मोठ्या कंपन्यांनी उत्पादन घटविल्याने काही लघुउद्योगांवर टाळे टाकण्याची वेळ आली आहे. अगदी उभारलेल्या शेडसाठी भाडेकरू मिळत नसल्याचे चित्र आहे. मागील दिवाळीनंतर थोडासा उठाव होता. परंतु, पुन्हा घसरण आहे. साधारणत: फळ, दूध प्रक्रिया उद्योग बºयापैकी सुरू आहेत. उद्योग बंद पडल्याने लघुउद्योजकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मध्यंतरी जीएसटीचे दरदेखील कमी करण्यात आले. परंतु, उद्योगांनी उभारी घेतली नसल्याचे चित्र आहे. सध्या दूध प्रक्रिया करणाºया उद्योगांसाठी महिला कामगार उपलब्ध होतात. त्यामुळे मोठ्या उद्योगांना अडचण नाही. मात्र, अभियांत्रिकी उत्पादन करणारे लघुउद्योग अडचणीत आले आहेत. कुशल, अकुशल कामगारदेखील बेकार झाले आहेत. यातून बाहेर कसे पडणार, अशी स्थिती आहे. एकूणच कामगारांची स्थिती बेकार राहण्यावर आली आहे.
>अनेक उद्योजक अडचणीत....
या संदर्भात बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले की, उत्पादन घटल्याने अनेक लघुउद्योगांना टाळे ठोकण्याची वेळ उद्योजकांना आली आहे. शेती, दूध यावर प्रक्रिया करणाºया उद्योगांना बरे दिवस आहेत. परंतु, अन्य उद्योग बंदच करण्यात आले आहे. सरकारने जीएसटीचे दरदेखील मध्यंतरी घटविले. तरीदेखील त्यामध्ये कोणताही फरक पडला नाही.

Web Title: Baramati entrepreneurs in crisis, many companies have time to halt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.