बारामतीत मोठा खुलासा..! नगर रचनाकार विकास ढेकळे १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:56 IST2025-03-20T16:54:38+5:302025-03-20T16:56:00+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ‘क्रेडाइ’ने केले सर्मथन

baramati city planner Vikas Dhekle caught red-handed while accepting a bribe of Rs 1 lakh | बारामतीत मोठा खुलासा..! नगर रचनाकार विकास ढेकळे १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

बारामतीत मोठा खुलासा..! नगर रचनाकार विकास ढेकळे १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

बारामती  - बारामती नगर परिषदेचे नगर रचनाकार विकास ढेकळे  यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी(दि २०) रंगेहात पकडले. क्रेडाई बारामतीचे सदस्य श्री भगवान चौधर यांनी याप्रकरणी एसीबी कडे तक्रार दाखल केली होती. एका बांधकाम परवानगी देण्यासंबंधी पैशाची मागणी केली होती.
क्रेडाई बारामती तर्फे वरील विकास ढेकळे यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले आहे.याबाबत क्रेडाई   अध्यक्ष राहुल खाटमोडे,सचिव अमोल कावळे यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे माहिती दिली.

बारामती नगर परिषदेस मिळणाऱ्या महसुलापैकी मोठा वाटा हा बांधकाम परवानगीच्या माध्यमातून जमा होत असतो .बारामती शहराच्या विकासामध्ये बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा आहे. बारामती नगर परिषदेतील नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा प्रचंड त्रास बारामती मधील सर्व बांधकाम व्यवसायिकांना मागील काही वर्षापासून होत असून मुख्याधिकारी सुद्धा याकडे कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास येत  असल्याचे क्रेडाई ने नमुद केले आहे.

ढेकळे यांच्यावरील कारवाईचे समर्थन करत असून क्रेडाई बारामती च्या वतीने प्रशासनास विनंती आहे की वरील प्रकारची गंभीर दखल घेऊन भविष्यात कार्यतत्परता व कार्यक्षमता वाढवावी. असं  क्रेडाईचे मत आहे. 

Web Title: baramati city planner Vikas Dhekle caught red-handed while accepting a bribe of Rs 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.