शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST

वाढती रुग्णसंख्या रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान बारामती: शहर व तालुक्यात सुपर स्प्रेडरमुळे कोरोना रूग्ण संख्या सातत्याने वाढत आहेत. प्रशासनाच्या वतीने ...

वाढती रुग्णसंख्या रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान

बारामती: शहर व तालुक्यात सुपर स्प्रेडरमुळे कोरोना रूग्ण संख्या सातत्याने वाढत आहेत. प्रशासनाच्या वतीने सुपर स्प्रेडरच्या शोधासाठी हॉटस्पॉट गावांमध्ये अँटिजेन तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. जवळपास १६ गावांमध्ये १३९ सुपर स्प्रेडर आतापर्यंत सापडले आहेत. मात्र संचारबंदी असतानाही वेगवेगळ्या कारणांसाठी लोक गर्दी करत असल्याने रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने बारामती शहर व तालुक्यात कहर केला आहे. दररोजची रूग्णसंख्या देखील ४०० च्या घरात पोहोचली आहे. तत्पूर्वी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ५ एप्रिलपासून बारामती शहर व तालुक्यामध्ये टाळेबंदी, तसेच कडक निर्बंध लावण्यात आले. मात्र २० दिवस उलटले तरी रूग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यात झालेल्या आढावा बैठकिमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहर व तालुक्यातील सुपर स्प्रेडरचा शोध घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार फिरत्या लॅबच्या माध्यमातून बारामती शहरात शुक्रवार (दि. २३) पासून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या अँटिजेन तपासण्या सुरू करण्यात आल्या. तसेच तालुक्यातील १६ हॉटस्पॉट गावांमध्ये देखील सुपर स्प्रेडरच्या शोधासाठी अँटिजेन तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुकानदार, भाजीपाला विक्रेते यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. तालुक्यात आतापर्यंत तब्बल १३९ सुपर स्प्रेडरची नोद झाली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

एकिकडे संक्रमित रूग्णांना उपचारासाठी करावी लागणारी पळापळ, प्रत्येक रूग्णाला उपचार मिळावा यासाठी प्रशासनाला करावी लागणारी तारेवरची कसरत यामुळे बारामती शहर व तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे. तसेच कारवाई होत असूनसुद्धा विनाकारण रस्त्यावर होणारी गर्दी यामुळे वाढत्या रूग्णसंख्येला खतपाणी मिळत आहे.

--------------------------------

दुसऱ्या लाटेमध्ये संक्रमणाचा वेग जास्त आहे. पहिल्या लाटेमध्ये वृद्ध व्यक्तींना संक्रमणाचा धोका अधिक असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये तरुण व्यक्तीसुद्धा कोरोनामुळे गंभीर होत आहेत. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अधिकाधिक प्रभावी वापर प्रत्येकाने करावा.

- मनोज खोमणे

तालुका आरोग्य अधिकारी

---------------------------------

बारामतीतील शुक्रवार (दि. २३)

पर्यंतची कोरोना रूग्ण स्थिती...

एकूण रूग्णसंख्या - १५,४७६

एकूण बरे झालेले - ११,५१४

एकूण मृत्यू - २७०

नव्याने संक्रमित - ३११

शुक्रवारी झालेले लसीकरण - ४,३८८

एकूण लसीकरण - ८२,२१९

--------------------------------

विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजेन तपासणी

सांगवी : सांगवी (ता. बारामती) येथे आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाकडून विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजेन तपासणी करण्यात आली. दरम्यान दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत. या वेळी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांनी पॉझिटिव्ह रुग्णांना घाबरून न जाता योग्य उपचार घेण्यासाठी सल्ला देऊन दिलासा दिला. या वेळी विनाकारण फिरणाऱ्यांना बारामती तालुका पोलिसांनी चांगलाच धसका दिला. तसेच नियम तोडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, बारामती-फलटण रस्त्यावर विनाकारण ये-जा करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी इशारा करताच काहींनी पळापळ सुरू करून थेट घरचा रस्ता धरला. यामुळे आता मोकाट फिरणारांची चांगलाच धसका घेऊन घरातच बसण्याचा निर्णय घेतला.

-----------------------------------

फोटो ओळी : सांगवी येथे फलटण रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजेन तपासणी करण्यात आली.

२४०४२०२१-बारामती-०९

------------------------------------