बाणेर पासपोर्ट कार्यालय उडवण्याची धमकी; परिसरात भीतीचे वातावरण, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 10:27 IST2026-02-27T10:26:32+5:302026-02-27T10:27:17+5:30

धमकीचा संदेश खोटा असल्याचे स्पष्ट झाले असले तरी नागरिक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते

Baner passport office threatened to be blown up; atmosphere of fear in the area, case registered against unknown | बाणेर पासपोर्ट कार्यालय उडवण्याची धमकी; परिसरात भीतीचे वातावरण, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

बाणेर पासपोर्ट कार्यालय उडवण्याची धमकी; परिसरात भीतीचे वातावरण, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : बाणेर येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात ई-मेल करणाऱ्याविरुद्ध बाणेरपोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.२६) सकाळी १० वाजून ७ मिनिटांनी अनोळखी ई-मेल पत्त्यावरून क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकृत मेलवर कार्यालय आरडीएक्सने उडवून देण्याचा खोटा संदेश पाठविण्यात आला. त्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी जतिन रवींद्र पोटे (वय ५१, रा. बाणेर) यांच्या तक्रारीवरून बाणेर पोलिस ठाण्यात ई-मेल करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्त (परिमंडळ-४) सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल दबडे (खडकी विभाग), वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक अलका सरग, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी सानप आणि महेश थिटे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश थिटे यांच्याकडे सोपविण्यात आला असून ई-मेलचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. धमकीचा संदेश खोटा असल्याचे स्पष्ट झाले असले तरी नागरिक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या खोट्या धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बाणेर येथील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात ई-मेल धारकावर बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ठिकाणी बॉम्ब शोधक पथकमार्फत बारकाईने तपासणी करण्यात आली आहे. पुढील तपास बाणेर पोलिस करीत आहेत. - चंद्रशेखर सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बाणेर पोलिस ठाणे

Web Title : बाणेर पासपोर्ट कार्यालय को बम से उड़ाने की धमकी: मामला दर्ज, क्षेत्र में दहशत

Web Summary : पुणे के बाणेर पासपोर्ट कार्यालय को ईमेल से बम से उड़ाने की धमकी मिली। पुलिस ने अज्ञात sender के खिलाफ मामला दर्ज किया। धमकी झूठी निकली, लेकिन दहशत फैल गई। ईमेल का स्रोत खोजने की जांच जारी है।

Web Title : Baner Passport Office Bomb Threat: Case Filed, Fear Grips Area

Web Summary : A bomb threat via email targeted the Baner Passport Office in Pune. Police filed a case against an unknown sender. The threat, later deemed false, caused temporary panic. Investigation is ongoing to trace the email's source.