' तुझ्यात जीव रंगला' फेम मिलिंद दास्ताने यांना जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 20:59 IST2019-07-04T20:57:53+5:302019-07-04T20:59:46+5:30

पीएनजी ब्रदर्स या सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत तब्बल 25 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

bail sanctioned of tujhyat jeev rangla fame Milind Dastane | ' तुझ्यात जीव रंगला' फेम मिलिंद दास्ताने यांना जामीन

' तुझ्यात जीव रंगला' फेम मिलिंद दास्ताने यांना जामीन

पुणे :   पीएनजी ब्रदर्स या सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत एका मराठी अभिनेत्याने व त्याच्या पत्नीने तब्बल 25 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ’तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता मिलिंद दास्ताने यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 
अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने, त्यांची पत्नी सायली मिलिंद दास्ताने ऊर्फ सायली बालाजी पिसे (दोघेही रा. त्रिमूर्ती सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) या दोघांवर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना 18 जून रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी पीएनजी ब्रदर्सच्या अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ (वय 34, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली होती. न्यायालयाने त्यांना दोन वेळा पोलिस कोठडी सुनाविल्यानंतर त्यांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश केले होते. दरम्यान, मिलिंद दास्ताने यांनी अ‍ॅड. सचिन झालटे आणि अ‍ॅड. अजिंक्य मिरगळ यांच्या मार्फत जामिनाचा अर्ज दाखल केला होता. एक वर्षांपूर्वी हा प्रकार घडला असून त्याप्रकरणाची फिर्याद देण्यास एक वर्षाचा कालावधी लागला आहे. सोन्याच्या बदल्यात दास्ताने यांनी धनादेश दिले आहे. ते मराठी अभिनेते व पुण्यातील स्थानिक रहिवासी असल्यामुळे पळून जाण्याची शक्यता नसल्याने जामीनाची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.

Web Title: bail sanctioned of tujhyat jeev rangla fame Milind Dastane