पुणेकरांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा बाबा भिडे पूल दीड महिने बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:57 IST2025-04-18T16:55:51+5:302025-04-18T16:57:28+5:30

पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनच्या पादचारी पुलाचे काम आता सुरू झाल्याने हा पूल बंद करण्यात आला आहे

Baba Bhide Bridge, considered very important for the transportation of Punekars, closed for one and a half months | पुणेकरांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा बाबा भिडे पूल दीड महिने बंद

पुणेकरांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा बाबा भिडे पूल दीड महिने बंद

पुणे: पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुणेकरांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा बाबा भिडे पूल हा पुढील दीड महिने बंद राहणार आहे. आजपासून हा पूल पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. 

नदी पात्रातला बाबा भिडे पुलाचा रस्ता दुचाकीच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा समजला जातो. शहराच्या मध्यवर्ती भागाला जोडणारा हा पूल असल्यामुळे याठिकाणी अनेक नागरिक दररोज प्रवास करतात. त्यांना मात्र आता पर्यायी मार्ग शोधावा लागणार आहे. पुण्यातील डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशन पुलाच्या कामासाठी बाबा भिडे पूल बंद करण्यात आला आहे. वाहतुकीसाठी पुढील दीड महिने हा पूल बंदच राहणार आहे. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे हा पूल बंद करण्यात येणार आहे. अशी कुठलीही पूर्वसूचना प्रशासनाकडून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जे पुणेकर दररोज या रस्त्याचा वापर करतात त्यांना मात्र इथून पुन्हा आता पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे. आणि त्यामुळेच एकंदरीत गैरसोय पुणेकरांची होताना दिसत आहे.

शहरातील प्रमुख जो मध्यवर्ती भाग आहे. सदाशिव पेठ, नारायण पेठ, डेक्कन परिसराचा भाग, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता या मुख्य रस्त्यांना जोडणारा हा पूल आहे. मात्र आता हाच बंद झाल्यामुळे इतर रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. दुचाकींसाठी अत्यंत सोयीचा मार्ग म्हणून या नदीपात्रातल्या रस्त्याचा वापर केला जातो.

पुणे मेट्रोने इथे फलक देखील लावलेला आहे. मात्र सुरुवातीला म्हणजे जिथून नदीपात्राचा रस्ता सुरू होतो त्याठिकाणी कुठलीही सूचना फलक लावलेले दिसत नाहीये. त्यामुळे नागरिकांना खरंतर ही गैरसोय गैरसोय होत आहे. जर नदीपात्राच्या सुरुवातीलाच अशा प्रकारचे फलक लावले असते. तर नागरिकांना कल्पना मिळाली असती आणि नागरिकांनी सुरुवातीलाच वेगळा पर्याय शोधला असता मात्र असं कुठेही झालेलं दिसत नाहीये. पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनच्या पादचारी पुलाचे काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याच कामासाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे.

Web Title: Baba Bhide Bridge, considered very important for the transportation of Punekars, closed for one and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.