बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठीच : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:15 IST2025-06-02T14:14:03+5:302025-06-02T14:15:43+5:30

शरद पवार म्हणाले, ९५ वा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य काही लोकांनाच मिळते. मोजक्या लोकांच्या जीवनात हा क्षण येतो.

Baba Adhav's entire life was for the society: Sharad Pawar | बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठीच : शरद पवार

बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठीच : शरद पवार

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांच्या सेवेसाठी वेचले आहे. या वयात बाबा आढाव सक्रियपणे काम करत आहेत. आजही ते विधायक कामे करत आहेत. आपण त्यांचा शंभरावा वाढदिवस लवकरच साजरा करू, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी बाबा आढाव यांना शुभेच्छा दिल्या.

पुण्यातील मार्केट यार्डमधील हमाल पंचायतीच्या कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी चळवळीचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ९५ वा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य काही लोकांनाच मिळते. मोजक्या लोकांच्या जीवनात हा क्षण येतो. बाबा आढाव आजही विधायक कामे करत आहेत. अन्याय अत्याचार विरोधात लढत आहेत. सामान्य माणसांचे ओझे हलके करण्याचे काम करत आहेत.

आपणा सर्वांसाठी ते मोठे आदर्श आहेत. कष्टकऱ्यांच्या जीवनात स्थिरता कशी येईल, त्याचा सातत्याने विचार करत बाबा काम करत राहिले. संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांसाठी काम करत त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी नेहमी सामान्य माणसांचे हितच पाहिले आहे. उपेक्षित समाजातील लोकांना संघर्ष करण्याची वेळ येऊ नये, यासाठी ते काम करत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात बाबांनी मोठे कार्य केले. आम्ही लोकांनी त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेतले आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

Web Title: Baba Adhav's entire life was for the society: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.