शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Baba Adhav passes away : ...अन् चाफा घेणारे हात आज देण्यासाठी पुढे सरसावले..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:03 IST

- हमाल भवनही बुडाले दु:खात; डाेळ्यांत अश्रू अन् मुखात ‘सत्य की जय हाे, बाबा आढाव अमर रहे’च्या घाेषणा

-उद्धव धुमाळेपुणे : भेटायला कुणीही आला की, डाॅ. बाबा आढाव ‘जिंदाबाद’ म्हणून स्वागत करत आणि निराेप घेताना चाफा हातात टेकवत. बाबांची भेट घेतली आणि हातात चाफा पडला नाही तर अनेकांना रुखरुख वाटत असे. चाफा आणि बाबा एक अतूट नातेच तयार झाले हाेते. पण, आज चाफा मिळणार नव्हता. देणारे हात थांबले हाेते आणि देणारे हे हात आपण घेतले पाहिजे, अशी भावना झालेल्या कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनाला आलेल्या सर्वांच्या हातात चाफा फूल टेकवत देणारे हात बनले हाेते.नेहमीच कष्टकऱ्यांच्या आवाजांनी गजबजणारे मार्केट यार्ड येथील हमाल भवन मंगळवारी (दि. ९) दु:खात बुडाले हाेते... राजकीय नेता असाे किंवा अधिकारी... कामगार असाे की व्यापारी... महिला असाे की चिमुकली... जाे ताे रांगेतून पुढे पुढे येत कष्टकऱ्यांचे नेते डाॅ. बाबा आढाव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत हाेता. चेहरा पाहताच अश्रूंना बांध फुटत हाेता. कष्टकऱ्यांबराेबरच विविध क्षेत्रांत कार्य करणारे दिग्गज देखील अश्रूंना आवर घालू शकले नाहीत. संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांसाठी वेचलेले, नैतिक अधिष्ठान असलेले असे नेतृत्व हाेणे नाही. सर्वांचा आधारवड हरपला, अशी भावना व्यक्त करत हाेते.हमाल भवन येथे सकाळी साडेआठ वाजता बाबांचे पार्थिव आणले गेले. त्यापूर्वीच कष्टकऱ्यांनी गर्दी केली हाेती.

सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाचपर्यंत अंत्यदर्शनाची रांग अखंड सुरू हाेती. कष्टकऱ्यांसह राजकारणातील, समाजकारणातील, व्यापारी यांसह विविध क्षेत्रांतील मंडळी अंत्यदर्शन घेत हाेते. आढाव कुटुंबीयांचे सांत्वन करीत हाेते. सायंकाळी चार वाजता मानवंदना देण्यासाठी पाेलिसांचा ताफा हमाल भवनात पाेहाेचला. सलामी दिली. त्यानंतर बराेबर पाच वाजता पार्थिव फुलांनी सजवलेल्या वाहनात ठेवून अंत्ययात्रा वैकुंठकडे मार्गस्थ झाली. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. हा संपूर्ण दिवस ‘अमर रहे अमर रहे, बाबा आढाव अमर रहे’, ‘सत्य की जय हाे’च्या घाेषणांनी दणाणून गेला हाेता.-------------सत्य की जय हाे...जिंदाबाद आणि सत्य की जय हाे... या केवळ घाेषणा नव्हत्या, तर डाॅ. बाबा आढाव यांच्या संपूर्ण आयुष्याचा मूलमंत्र हाेते. हे सर्वच चाहत्यांना माहीत हाेते. त्यामुळे कष्टकरी महिलांनी पार्थिवांसमाेरच ‘सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर । जगामाजी सुख सारे, खास सत्याची ती पोरे’ आणि ‘आजचे अमुचे पराभव, पचवितो आम्ही उद्यास्तव । विजय तो कसला उरावर, जखम जो करणार नाही ।। हे असे आहे तरी पण, हे असे असणार नाही । दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही’ यांसह समतेची विविध गाणी गात हाेती.----------चिमुकल्यांचेही पाणावले डोळे कष्टकरी महिला ‘बोला क्रांती जिंदाबाद,’ ‘बाबा आढाव अमर रहे’ अशा घोषणा देत हाेत्या. चळवळीची गाणी गात हाेत्या. सर्वांच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. कष्टकरी, हमाल यांच्याबराेबरच डॉ. बाबा आढाव यांनी आपल्या आयुष्याच्या श्रमातून उभ्या केलेल्या हमाल पंचायत कष्टकरी विद्यालयातील विद्यार्थीही आपल्या लाडक्या ‘बाबां’ना अखेरचा निरोप देण्यास आले हाेते. अक्षरांची ओळख करून दिली, स्वप्न पाहण्याचे बळ दिले त्या बाबांना अखेरचा नमस्कार करताना चिमुकल्यांचेही डोळे पाणावले हाेते.

English
हिंदी सारांश
Web Title : Baba Adhav, veteran labor leader, passes away in Pune.

Web Summary : Dr. Baba Adhav, a leader for workers, passed away, leaving behind mourners from all walks of life. His funeral saw a large gathering, with many remembering his contributions and commitment to social justice. The air resonated with slogans of 'Satya Ki Jai Ho.'
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaba Adhavबाबा आढावPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र