Ayush Komkar: आयुष्य कोमकर खून प्रकरण! बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर अखेर पोलिसांना शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 12:49 IST2025-09-16T12:48:09+5:302025-09-16T12:49:38+5:30

कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आराेपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या सर्वांना आता अटकही करण्यात आली आहे.

Ayush Komkar murder case! Bandu Andekar's son Krishna Andekar finally surrenders to the police | Ayush Komkar: आयुष्य कोमकर खून प्रकरण! बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर अखेर पोलिसांना शरण

Ayush Komkar: आयुष्य कोमकर खून प्रकरण! बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर अखेर पोलिसांना शरण

पुणे: नाना पेठेतील टोळीयुद्धातून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या आंदेकर टोळीतील शिवम आंदेकरसह चौघांना गुजरात सीमेवरून अटक करण्यात आली. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर अद्यापही पसार होता. आज अखेर कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण आला आहे.  कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक आहे. पोलिसांकडून कृष्णा आंदेकरला अटक करण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान तो काही वेळापूर्वी पुणे पोलिसांमध्ये हजर झाला आहे.

या प्रकरणी गुजरात सीमेवरून शिवम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९) आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, सर्व रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली होती. आज शरण आलेल्या कृष्णा आंदेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे  कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर (७०), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (२७), स्वराज नीलंजय वाडेकर (२३), मुलगी वृंदावनी नीलंजय वाडेकर (४०), अमन युसूफ पठाण (२५), यश सिद्धेश्वर पाटील (१९), अमित प्रकाश पाटोळे (१९, सर्व रा. नाना पेठ) आणि सुजल राहुलू मेरगु (२०, आंध्र झार आळी, भवानी पेठ) यांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयुष कोमकर हा लहान भावाला क्लासवरून घेऊन साडेसातच्या सुमारास नाना पेठेतील हमाल तालमीजवळ असलेल्या सोसायटीत आला. तळमजल्यावर दुचाकी लावत असताना आयुषवर पिस्तुलातून बेछूट गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता. याबाबत आयुषची आई कल्याणी (३७) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडू आंदेकरसह साथीदारांना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली. आंदेकर टोळीतील पाच आरोपी पसार झाले होते. गुन्हे शाखेचे पथके त्यांच्या मागावर होती. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आराेपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या १३ जणांना अटकही करण्यात आली आहे. 

Web Title: Ayush Komkar murder case! Bandu Andekar's son Krishna Andekar finally surrenders to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.