शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

आरटीई मदत केंद्रातून प्रवेश अर्ज भरण्यास टाळाटाळ : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 7:54 PM

राज्यातील खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या २५ टक्के जागा या वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देआरटीई प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी पुणे जिल्हामध्ये ९३ मदत केंद्र सुरू मदत केंद्रांच्या समन्वयकांकडून हद्दीचा वाद मदत केंद्रांच्या समन्वयकांकडून हद्दीचा वाद 

पुणे : मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार (आरटीई) शाळांमध्ये दिल्या जाणाºया २५ टक्के मोफत प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी शासनाकडून जिल्हानिहाय मदत केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र पुणे शहरातील अनेक मदत केंद्रांमध्ये पालकांना अर्ज भरून देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून आले आहे.राज्यातील खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यम व मराठी माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या २५ टक्के जागा या वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या प्रवेशासाठी आरटीईच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ मार्चपासून सुरू झालेली आहे. आरटीई प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी पुणे जिल्हामध्ये ९३ मदत केंद्र सुरू करण्यात आले आहेत. पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या मदत केंद्रांची यादी आरटीईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये मदत केंद्राचे नाव, संपर्क पत्ता, समन्वयकांचा मोबाइल नंबर व लँडलाइन फोन नंबर आदी माहिती दिलेली आहे. मात्र या मदत केंद्रातील समन्वयकांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता आरटीई अर्ज भरून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मदत केंद्रातील समन्वयक शक्यतो फोन उचलत नाहीत. कोथरूडच्या पंडित दीनदयाळ शाळेतील शिक्षिका अरूणा रजनी यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. औंधच्या इंदिरा प्राथमिक विद्यालयाच्या समन्वयक म्हणून ललिता जाधव या निवृत्त झाल्या असतानाही त्यांचे समन्वयक नाव देण्यात आले आहे. हडपसर गाडीतळ येथील महात्मा फुले विद्यालयाच्या समन्वयकांशी संपर्क साधला असता तुम्ही मुंढव्यात राहत असाल तरच तुमचा अर्ज भरेन, असे त्यांनी सांगितले. अहिल्यादेवी होळकर स्कूलच्या शिवाजी बोखरे यांनीही फोनला कोणताही प्रतिसाद दिला नाही. मदत केंद्रांतील समन्वयकांनी आरटीई प्रवेशासाठी पालकांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यांच्याकडून अर्ज भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. शिक्षण विभागाने आरटीई मदत केंद्रावर संगणक, इंटरनेट, प्रिंटर आदी सुविधा उपलब्ध आहेत का याची कुठलीच खातरजमा केलेली नाही. शिक्षकांना आरटीई अर्ज कसा भरायचा याबाबतही नीट माहिती नसल्याचे चित्र काही मदत केंद्रांवर दिसून येत आहे. काही ठिकाणी संगणकामध्ये बिघाड झाला असून सायबर कॅफेत जाऊ अर्ज भरा असा अनाहूत सल्ला दिला जात आहे. त्यामुळे पालकांची मोठी गैरसोय होत आहे.  ...................मदत केंद्रांच्या समन्वयकांकडून हद्दीचा वाद आरटीई मदत केंद्रातून आरटीईचे अर्ज ऑनलाइन भरायचे आहेत. त्यामुळे कुठूनही कुठल्याही विद्यार्थ्याचा अर्ज भरता येणे शक्य आहे. मात्र मदत केंद्रातील समन्वयक अर्ज भरण्याचे टाळण्यासाठी हद्दीचा वाद घालत आहेत. तुम्ही राहता ते ठिकाण माझ्या हद्दीत येत नाही असे सांगून मदत केंद्रातील समन्वयकांकडून अर्ज भरण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे पालक हतबल झाल्याचे दिसून येत आहे. 

....................

शिक्षण संचालक, सहसंचालकांचे दुर्लक्षआरटीई मदत केंद्रातून अर्ज भरण्याबाबत पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना याबाबत पालकांनी शिक्षण संचालक सुनिल चव्हाण, सहसंचालक दिनक टेमकर, उपसंचालक मिनांक्षी राऊत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात उपलब्ध झाले नाहीत. ह्यसर एनआयसीमध्ये बैठकीला गेले आहेत एवढे एकच उत्तर त्यांच्या कार्यालयातून दिले जात आहे. शिक्षण विभागाच्या या दुर्लक्षामुळेच पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे..................* बार्टीच्या समतादूतांचे कौतुकास्पद कामराज्य शासनाच्या मदत केंद्रांमधून अर्ज भरण्यास टाळाटाळ केली जात असतानाच दुसरीकडे बार्टीच्या समतादूतांकडून मात्र शहरातील झोपडपटटयांमध्ये फिरून आरटीईचे अर्ज भरून घेण्याचे कौतुकास्पद काम सुरू आहे. त्यांनी राज्यभरातून आतापर्यंत ११ हजार ३३७ अर्ज पालकांना भरून दिले आहेत. पुणे शहरातून ७१० आरटीईचे अर्ज भरले गेले आहेत.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSchoolशाळाRight To Educationशिक्षण हक्क कायदा