शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षा मीटरचे प्रमाणीकरण करा

By admin | Updated: July 28, 2015 00:44 IST

सुधारित भाडेवाढीनुसार रिक्षाचालकांना मीटरचे प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे. मात्र अजूनही निम्म्यापेक्षा जास्त रिक्षाचालकांनी प्रमाणीकरण केलेले नाही.

पुणे : सुधारित भाडेवाढीनुसार रिक्षाचालकांना मीटरचे प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे. मात्र अजूनही निम्म्यापेक्षा जास्त रिक्षाचालकांनी प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी १५ आॅगस्टपूर्वी प्रमाणीकरण करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे.प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने २८ मे रोजी झालेल्या बैठकीत रिक्षांच्या भाडेदरवाढीस मान्यता दिली आहे. नवीन भाडेदर १ जुलैपासून लागू करण्यात आले आहेत. त्यासाठी मीटरचे प्रमाणीकरण करण्यासाठी दि. १५ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रमाणीकरण हे वैधमापन विभागाकडून करण्यात येत आहे. २२ जुलैपर्यंत सुमारे ४५ हजार रिक्षांपैकी १६ हजार ८८३ रिक्षांचे प्रमाणीकरण झालेले आहे. इतर रिक्षांचे प्रमाणीकरण १५ आॅगस्टपर्यंत करणे बंधनकारक आहे, असे पाटील यांनी सांगितले.आरटीओच्या वायुवेग पथकांमार्फत रिक्षांची तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत व तपासणी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. तसेच प्रवाशांची गैरसोय टाळावी, असेही आवाहन पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)