शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील हजारो विद्यार्थिंनींची उपस्थिती भत्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:11 IST

पुणे : जिल्ह्यात पहिली ते चौथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थिंनींची उपस्थिती भत्ता कोरोनामुळे बंद केला आहे. मात्र, समाज कल्याण ...

पुणे : जिल्ह्यात पहिली ते चौथीमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थिंनींची उपस्थिती भत्ता कोरोनामुळे बंद केला आहे. मात्र, समाज कल्याण विभागाने व एकात्मक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सर्व विद्यार्थिंनींना उपस्थिती भत्ता दिला जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व शाळेत उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी पहिली ते चौथीमधील शाळेत जाणाऱ्या आदिवासी उपयोजन क्षेत्राव्यतिरिक्त अन्य भागातील अनुसूचित जाती/जमातींच्या दारिद्र रेषेखालील मुलींना उपस्थिती भत्ता दिला जातो. शाळेत नियमित उपस्थिती राहणाऱ्या विद्यार्थीनींना वार्षिक रुपये २२० कमाल मर्यादेच्या अधिन राहून एका दिवसाला एक रुपया याप्रमाणे एकूण वर्षाच्या ७५ टक्के हजेरी असणाऱ्या मुलींना हा उपस्थिती भत्ता दिला जातो.

कोरोना काळात विद्यार्थिंनींसाठी राबविल्या जाणाऱ्या उपस्थिती भत्ता योजनेचा लाभ दिला जाऊ नये, असे आदेश राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत. त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थिंनींचा उपस्थिती भत्ता बंद झाला आहे. मात्र, या योजनेमुळे प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी होऊन शाळेतील मुलींच्या उपस्थितीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे ही योजना बंद करण्याऐवजी उपस्थिती भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी केली जात आहे.

--

राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार कोरोनामुले जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थिंनींचा उपस्थिती भत्ता यंदा दिला जाणार नाही.

- सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

---

कोरोनामुळे समाज कल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी राबविली जाणारी एकही योजना बंद केलेली नाही. सावित्रीबाई फुले यांच्या नावे राबविल्या जात असलेल्या योजनेद्वारे विद्यार्थींना उपस्थिती भत्ता दिला जातो, असे समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

----

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपस्थिती भत्ता योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात सुमारे २६ हजार विद्यार्थीनींना लाभ दिला जातो. दोन दिवसांपूर्वीच या विद्यार्थींच्या उपस्थिती भत्त्याची ३ कोटी ७५ लाख रुपये रक्कम वितरित केली आहे.

---

राज्यातील उपस्थिती भत्ता मिळणाऱ्या विद्यार्थिंनींची आकडेवारी

वर्ष लाभार्थी विद्यार्थीनी योजनेवरील खर्च

२०१४-१५ २,४०,४४० ५,२८,९७,०००

२०१५-१६ २,५१,४४० ५,५३,०२,०००

२०१६-१७ ३,७३,२७२ ८,२१,२०,०००

२०१७-१८ १,४७,६८२ ३,२४,९१,०००

२०१९-२० १,८४, ८०४ ३,२४,९३,०००

२०२०-२१ १,८४, ८०४ ४,०६,५७,०००