पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:12 IST2021-03-21T04:12:08+5:302021-03-21T04:12:08+5:30

पुणे : पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी प्रथमेश उर्फ सोनू लक्ष्मण कामाठी (वय २१, ...

Attempted murder of a young man out of prejudice | पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

पुणे : पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी प्रथमेश उर्फ सोनू लक्ष्मण कामाठी (वय २१, रा. पीएमपी कॉलनी, कसबा पेठ) याला अटक केली आहे.

या प्रकरणी स्वप्निल पवार (वय २१, रा.कसबा पेठ) याने फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना कसबा पेठेतील पीएमसी कॉलनीत गुरुवारी सायंकाळी सव्वाआठ वाजता घडली होती.

प्रथमेश आणि स्वप्निल पवार या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. स्वप्निल हा त्याच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पीएमसी कॉलनीत आला होता. त्यावेळी प्रथमेश याने पवार याला माझ्याकडे रागाने बघतोस, तुला आता जीवे मारून टाकतो, असे म्हणून हातातील चाकूने पवार याच्या डोक्यावर, मानेवर, तसेच डाव्या दंडावर वार करून जबर जखमी केले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून प्रथमेशला अटक केली आहे.

Web Title: Attempted murder of a young man out of prejudice