Pune: नऊशे रुपयांसाठी मित्राचा मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न, पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 11:35 IST2024-05-11T11:34:36+5:302024-05-11T11:35:25+5:30

एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला...

Attempted murder of a friend by stabbing a friend for nine hundred rupees, incident in Warje area | Pune: नऊशे रुपयांसाठी मित्राचा मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न, पुण्यातील घटना

Pune: नऊशे रुपयांसाठी मित्राचा मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न, पुण्यातील घटना

पुणे : आर्थिक कारणातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. सचिन तानाजी भानसे (३५, रा. रामनगर, वारजे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी, वारजे पोलिसांनी धनंजय बोराणे (३८, रा. रामनगर वारजे) याला अटक केली आहे. याबाबत भानसे याने दिलेल्या फिर्यादीनुसार बोराणे याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. ८) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.

फिर्यादी आणि आरोपी हे दोघे एकमेकांचे मित्र असून, एकाच खोलीत वास्तव्यास आहेत. दोघे मजूर काम करतात. बोराणे याने भानसे याच्याकडे ९०० रुपयांची मागणी केली होती. त्याला भानसे याने नकार दिला. त्यातून दोघांत वाद झाला असता, बोराणे याने भानसे याच्यावर कोयत्याने वार केले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दुगावकर करत आहेत.

Web Title: Attempted murder of a friend by stabbing a friend for nine hundred rupees, incident in Warje area