पुणे : शिवणे गावात टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 15:30 IST2022-05-06T15:26:59+5:302022-05-06T15:30:46+5:30

पोलिसांकडून आरोपीविरोधात गुन्हा दाखल....

attempt to terrorize the mob in Shivne village pune crime news | पुणे : शिवणे गावात टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पुणे : शिवणे गावात टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

शिवणे (पुणे) : येथील दुधाने पेट्रोल पंपासमोर गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास प्रवीण धनराज सुतार (वय २७ वर्षे ) या युवकास सहा जणांच्या टोळक्याने लोखंडी कोयता, लाकडी बांबू आणि दगडाच्या साहाय्याने गंभीर मारहाण केली आहे. या घटनेत हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शिवणे येथील यशोराही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्री पंढरीनाथनगर येथे लावलेली गाडी घेण्यासाठी जात असताना आरोपी सचिन दळवी, सुरज मारवाडा, वाघमारे आणि त्यांचे आणखी तीन साथीदार यांनी मिळून प्रविण सुतार यास मारहाण करून त्याला जीवे मारायचा प्रयत्न केला. त्यानंतर ते जवळील सोसायटीमध्ये फिरून हातात कोयते, बांबू आणि दगड घेऊन तेथील लोकांना शिवीगाळ करून "आम्ही या भागातील भाई आहोत कोणी बाहेर आले तर मारून टाकू"  असे धमकावले.

रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. तसेच दुचाकींचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
संबंधितांवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. डी. रोकडे पुढील तपास करत आहेत.

Web Title: attempt to terrorize the mob in Shivne village pune crime news