पुण्यातील पटवर्धन बागेत तरुणीचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपीला सशर्त जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 13:52 IST2024-04-13T13:51:35+5:302024-04-13T13:52:04+5:30

पायी घराकडे जात असताना तिच्या खांद्यावर पाठीमागून हात टाकून तिचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न...

Attempt to strangle young woman to death; Conditional bail to the accused | पुण्यातील पटवर्धन बागेत तरुणीचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपीला सशर्त जामीन

पुण्यातील पटवर्धन बागेत तरुणीचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपीला सशर्त जामीन

पुणे : पुण्यातील पटवर्धन बागेत रात्रीच्या वेळी २३ वर्षीय तरुणीला रस्त्याने पायी घराकडे जात असताना तिच्या खांद्यावर पाठीमागून हात टाकून तिचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात आरोपीला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.जी चव्हाण यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे.

राजा नेत्रम यादव असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे. ॲड. हेमंत शिवाजी निवंगुणे यांनी आरोपीच्या वतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या प्रकाराबाबत तरुणीने अलंकार पोलिस चौकीत तक्रार दाखल केली होती.

ॲड. निवंगुणे यांनी युक्तिवाद केला की, आरोपी हा आठ महिने कालावधी पेक्षा जास्त काळ तुरुंगात होता. किरकोळ झालेल्या वादाला मुलीने वेगळेच वळून देऊन ३०७ व ३५४ सारख्या गंभीर कलमांचा गैरवापर करून आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.

Web Title: Attempt to strangle young woman to death; Conditional bail to the accused