चौथ्या स्तंभावरील हल्ले लोकशाहीला घातक : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 01:49 PM2023-04-09T13:49:52+5:302023-04-09T13:50:09+5:30

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होत असलेली गळचेपी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही

Attacks on the fourth pillar are dangerous to democracy: Ajit Pawar | चौथ्या स्तंभावरील हल्ले लोकशाहीला घातक : अजित पवार

चौथ्या स्तंभावरील हल्ले लोकशाहीला घातक : अजित पवार

googlenewsNext

पुणे: ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर आज चौफेर हल्ले होत आहेत. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होत असलेली गळचेपी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही. सध्या घडत असलेल्या घटना पाहता अघोषित आणीबाणी येत आहे की काय, असा प्रश्न पडताे’, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित ‘धडपड’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

पवार म्हणाले की, ‘कोकणात पत्रकाराची हत्या झाली. मागील आठवड्यात एका पत्रकाराला मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी दम दिल्याचे समाेर आले. छत्रपती संभाजीमहाराज नगरमध्ये खोकेवरून रॅप साॅंग करणाऱ्याला जेलमध्ये टाकले. खोका हा उल्लेख केला; परंतु, त्याला अटक करून संबंधितांनी खोक्याचे एकप्रकारे समर्थन केले आहे. पिंपरी- चिंचवडमधील पत्रकाराला शाई फेकीच्या गुन्ह्यात गोवले गेले. पत्रकारांनी एकजूट दाखवल्यावर त्याला गुन्ह्यातून वगळले गेले. सुसंस्कृत महाराष्ट्रातील हा प्रकार एक शोकांतिका असून, असे प्रकार थांबले पाहिजेत. यासाठी सगळ्यांनी एकजूट करण्याची गरज आहे. म्हातारी मेली तरी चालेल; पण काळ सोकावता कामा नये. यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत.

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांची संघर्ष गाथा ‘धडपड’ या पुस्तकामधून मांडली आहे. केवळ राजकारणी व्यक्तीच नव्हे तर समाजकारणात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी हे पुस्तक आवश्य वाचावे, असे आवाहनही पवार यांनी केले. पुस्तकाचे लेखक श्याम दौंडकर यांनी प्रास्ताविक केले, प्रदीप देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Attacks on the fourth pillar are dangerous to democracy: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.