Video: कोंढवा परिसरात भररस्त्यात एकमेकांवर वार; पार्किंगच्या वादातून जमावातच तुफान राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:56 IST2025-03-20T14:52:45+5:302025-03-20T14:56:33+5:30
पार्किंगच्या किरकोळ वादातून एकमेकांना धारदार शस्त्रांनी मारहाण झाल्याची धक्कादायक घटना

Video: कोंढवा परिसरात भररस्त्यात एकमेकांवर वार; पार्किंगच्या वादातून जमावातच तुफान राडा
पुणे: सार्वजनिक रस्त्यावर कार पार्किंग करण्यावरून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर दोघांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने वार करून एकमेकांना जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत दोघेही जखमी झाले असून, ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
गणेश सुभाष राखपसरे (३२, रा. आश्रफनगर, शेरखान चाळ, कोंढवा बुद्रुक) आणि आश्रफ आश्फाक शेख (३०, रा. भाग्यलक्ष्मी टॉवर, मिठानगर, कोंढवा) अशी या दोघांची नावे आहेत. ही घटना कोंढव्यातील कौसरबाग येथील सना हॉस्पिटलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर बुधवारी (दि. १९) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.
कोंढवा परिसरात भररस्त्यात एकमेकांवर वार; पार्किंगच्या वादातून जमावातच तुफान राडा#Pune#Police#Crime#kondhawapic.twitter.com/xW0eyIGd3v
— Lokmat (@lokmat) March 20, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश राखपसरे यांनी त्यांची कार कौसरबाग येथील सना हॉस्पिटलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली होती. त्यावरून त्यांचा व आश्रफ शेख यांच्याशी वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणामध्ये झाले. त्यामध्ये दोघांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने मारहाण करून परस्परांना जखमी केले. दोघेही या प्रकरणात जखमी झाले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दोघांनी एकमेकांविरुद्ध फिर्यादी दिली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. ससून हॉस्पिटल येथे दोघांवर उपचार पूर्ण होताच त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.