VIDEO | मुंढव्यात खंडणीसाठी व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 09:01 AM2022-11-22T09:01:23+5:302022-11-22T09:07:45+5:30

हल्ल्याचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे...

Attack on businessman for extortion in Mundhwa, Shocking incident captured on CCTV | VIDEO | मुंढव्यात खंडणीसाठी व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद

VIDEO | मुंढव्यात खंडणीसाठी व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद

googlenewsNext

पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे :मुंढवा परिसरातील केशवनगर भागात खंडणीच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांवर आणि दुकानदारांवर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. हातात कोयता घेत आलेल्या दोन तरुणांनी दुकानांची तोडफोड करत व्यापाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे व्यापारी भयभीत झाले आहेत. हल्ल्याचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास केशवनगर भागातील हरिओम ट्रेडिंग कंपनी या दुकानावर हातात कोयता घेऊन दोन अज्ञात तरुणांनी हल्ला चढवला. व्यापाऱ्यांकडे खंडणी मागत ठार मारण्याची धमकी दिली. या हल्लेखोरांनी हातातील कोयत्याने दुकानातील साहित्याची नासधूस केली. या घटनेनंतर केशवनगर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकच दहशत पसरली आहे. हल्ल्याचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

या भागात सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. हल्लेखोर व्यापाऱ्यांना, दुकानदारांना कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागत आहेत. पैसे न दिल्यास दहशत माजवणे, दुकानाची तोडफोड करणे असे प्रकार वारंवार होत आहेत. अशा घटनांची पोलिसांना माहिती देऊनही संबंधित गुन्हेगारावर कुठलीही कारवाई होत नाही. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे केशवनगर परिसरातील लहान मुले, महिला आणि व्यापारी घाबरून गेले आहेत. त्यामुळे अशाप्रकारे दहशत वाजवणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने केली आहे.

Web Title: Attack on businessman for extortion in Mundhwa, Shocking incident captured on CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.