TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात 'त्याने' तुकाराम सुपेला दिले ३० लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 21:12 IST2022-02-10T21:11:57+5:302022-02-10T21:12:09+5:30
तुकाराम सुपेला २०१८ साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार याने ३० लाख रुपये दिले असल्याची माहिती शिवकुमार याने स्वत: तपासादरम्यान पोलिसांना दिली

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात 'त्याने' तुकाराम सुपेला दिले ३० लाख
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम सुपेला २०१८ साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार याने ३० लाख रुपये दिले. शिवकुमार याने स्वत: ही माहिती तपासादरम्यान पोलिसांना दिली.
या गुन्ह्याच्या तपासासाठी सुपे आणि परीक्षा घेणाऱ्या जी.ए.टेक्नॉलॉजी प्रा.लि. कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याचे एजंट संतोष लक्ष्मण हरकळ (वय ४२, रा. औरंगाबाद) व अंकुश रामभाऊ हरकळ (वय ४४, रा. बुलढाणा) यांना अटक करण्यात आली आहे. बनावट प्रमाणपत्र आल्यानंतर सुपे यांनी संबंधितांवर कारवाई का केली नाही? प्रमाणपत्र मिळालेले १८ विद्यार्थी कोण आहेत? तसेच तपासादरम्यान पुढे आलेल्या विविध बाबींचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला. न्यायालयाने आरोपींना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, २०१८ साली झालेल्या टीईटी परीक्षेच्या निकालाबाबत राज्य परीक्षा परिषदेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच जळगाव येथील शिक्षणाधिकारी यांच्याकडून ८१ बनावट प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर जबाबदार पदावर काम करीत असताना सुपे यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. संतोष हरकळ याच्या विद्यार्थ्यांच्या यादीमधील १८ परीक्षार्थींना गुणपत्रक न मिळाल्याने शिवकुमार याने त्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांची रंगीत प्रिंट काढून मुंबईतील एका एजंटला नेउन दिली होती.