शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आश्विन, पावनीला जेतेपद

By admin | Updated: May 9, 2017 04:01 IST

बंगळुरूच्या आश्विन भटने अभिषेक मांगलेचा आणि पुण्याच्या पावनी पाठकने सायना देशपांडेचा पराभव करून सोलारिस क्लब

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बंगळुरूच्या आश्विन भटने अभिषेक मांगलेचा आणि पुण्याच्या पावनी पाठकने सायना देशपांडेचा पराभव करून सोलारिस क्लब अखिल भारतीय १६ वर्षांखालील गटाच्या अजिंक्यपद मालिका (चॅम्पियन सिरीज) टेनिस स्पर्धेत विजेतेपद संपादन केले. सोलारिस क्लब (मयूर कॉलनी) येथे झालेल्या अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित आश्विन भट याने अग्रमानांकित आणि पुण्याच्या अभिषेक मांगलेचा ६-४, ६-२ असा सहज पराभव करून मुलाच्या गटाचे विजेतेपद संपादन केले. सुमारे तासभर चाललेल्या या सामन्यात आश्विन याने अभिषेकपेक्षा अधिक सरस खेळ केला. १० व्या गेमपर्यंत रंगलेल्या पहिल्या सेटमध्ये आश्विनने ६-४ असा विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये आश्विनने वर्चस्व गाजवले. अभिषेकला सामन्यामध्ये परतण्याची संधी न देता ६-२ असा सहज सेट जिंकत विजेतेपद संपादन केले. दुसऱ्यांदा पुण्यामध्ये खेळण्यास आलेल्या आश्विनचे हे १६ वर्षांखालील गटाचे या वर्षीचे पहिलेच विजेतेपद ठरले. पुण्यामध्ये पहिल्यांदाच विजेतेपद मिळवणारा १४ वर्षीय आश्विन हा बंगलोर येथील डीपीएस शाळेत १० वी इयत्तेत शिकतो. मुलींमध्ये चौथ्या मानांकित पावनी पाठक हिने पुण्यातील आणि बिगरमानांकित सायना देशपांडे हिचा ६-२, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळवले. ८५ मिनिटे रंगलेल्या या सामन्यामध्ये पावनी हिने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. १३ वर्षीय पावनीने काल उपांत्य फेरीत अग्रमानांकित काम्या परब हिचा पराभव केला होता. आपला हाच फॉर्म कायम ठेवत तिने बिगरमानांकित सायना देशपांडेचा सरळ सेटमध्ये पराभव करून या वयोगटातील या वर्षातील पहिलेच विजेतेपद संपादन केले. मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या पावनी हिने प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी हैदराबाद येथे स्थलांतर केले असून ती हैदराबाद येथे इंडस इंटरनॅशनल शाळेत ८ वी इयत्तेमध्ये शिकते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोलारिसचे संचालक जयंत पवार व स्पर्धेचे संचालक रवींद्र पांड्ये यांच्या हस्ते झाले. या वेळी क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली व एआयटीए निरीक्षक तनया गोसावी उपस्थित होते. विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्रक देण्यात आली.