Video : खरात प्रकरणाला नवे वळण; तृप्ती देसाईंवर ‘कोट्यवधींच्या सेटलमेंट’चा गंभीर आरोप

By किरण शिंदे | Updated: March 22, 2026 12:56 IST2026-03-22T12:54:57+5:302026-03-22T12:56:14+5:30

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या सेटलमेंटचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Ashok Kharat Crime News New twist in Kharat case; Serious allegations of 'settlement worth crores' against Trupti Desai | Video : खरात प्रकरणाला नवे वळण; तृप्ती देसाईंवर ‘कोट्यवधींच्या सेटलमेंट’चा गंभीर आरोप

Video : खरात प्रकरणाला नवे वळण; तृप्ती देसाईंवर ‘कोट्यवधींच्या सेटलमेंट’चा गंभीर आरोप

पुणे - नाशिक परिसरात चर्चेत असलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या सेटलमेंटचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट आरोप करत या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा दावा केला आहे.

लोकमतशी बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी सांगितले की, तृप्ती देसाई यांच्याकडे या प्रकरणातील महत्त्वाचे व्हिडिओ पुरावे आधीपासूनच उपलब्ध होते. मात्र, तरीही त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यासोबत तडजोड केल्याचा आरोप आहे. या तडजोडीत कोट्यवधी रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच, SIT तपासादरम्यान ही बाब समोर आल्याचा दावाही त्यांनी केला. पीडितांना न्याय मिळावा म्हणून दिलेले पुरावे दाबले गेले, ही अत्यंत गंभीर बाब आहे, असेही त्या म्हणाल्या.



या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात रुपाली चाकणकर यांना तात्काळ अटक करा, संपूर्ण प्रकरणाची सखोल SIT चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करा, या मागण्या केल्या आहेत. रुपाली पाटील ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलतांना पीडित महिलांना आवाहन करत म्हटले की, भीती न बाळगता पुढे या, तक्रार नोंदवा. कायदा तुमच्या बाजूने आहे.
 
दरम्यान, कॅप्टन अशोक खरात यांच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. शेकडो महिलांवर अत्याचार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही प्रकरणांमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title : खरात मामले में नया मोड़: तृप्ति देसाई पर सेटलमेंट का आरोप

Web Summary : रूपाली पाटिल ठोंबरे ने तृप्ति देसाई पर खरात मामले को करोड़ों में निपटाने का आरोप लगाया। उनका दावा है कि देसाई के पास महत्वपूर्ण सबूत थे, फिर भी उन्होंने रूपाली चाकणकर से समझौता किया। पाटिल ने एसआईटी जांच और चाकणकर सहित आरोपियों के खिलाफ कार्रवाई की मांग की, पीड़ितों से आगे आने का आग्रह किया।

Web Title : Kharat Case Takes Turn: Trupti Desai Accused of Settlement Scam

Web Summary : Rupali Patil Thombre alleges Trupti Desai settled the Kharat case for crores. She claims Desai possessed crucial evidence but compromised with Rupali Chakankar. Patil demands an SIT investigation and action against the accused, including Chakankar, urging victims to come forward.