"५८ व्हिडीओ आहेत, रुपाली चाकणकर पुरावे नष्ट करतील", अशोक खरात प्रकरणात रुपाली पाटलांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:38 IST2026-03-19T12:24:43+5:302026-03-19T12:38:15+5:30
Captain Ashok Kharat Case : राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी नाशिक येथील अशोक खरात प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत.

"५८ व्हिडीओ आहेत, रुपाली चाकणकर पुरावे नष्ट करतील", अशोक खरात प्रकरणात रुपाली पाटलांचा गौप्यस्फोट
Ashok Kharat Case : नाशिकमधीलअशोक खरात प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. खरात याच्याविरोधात एका महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, आता या प्रकरणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी ५८ व्हिडीओ आहेत. म्हणजेच ५८ महिलांवर अत्याचार झाला आहे का? हे पुरावे चाकणकर नष्ट करतील, असा गंभीर आरोप पाटील ठोंबरे यांनी केला. आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ठोंबरे पाटील यांनी हे आरोप केले.
'राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पदापदावरून पायउतार झाले पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही, असेही ठोंबरे पाटील म्हणाल्या. हा विषय कोणत्या पक्षाचा, जातीचा नाही तर हा विषय महिलांचा आहे. १ वर्षापूर्वी या प्रकरणाची वाचा फोडली होती. ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली निलेश चाकणकर आहेत. त्यामुळे पोलिस कारवाई करत नव्हते का? ५८ व्हिडीओ आहेत. म्हणजे ५८ महिलांवर अत्याचार झाला आहे का? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पदापदावरून पायउतार झाले पाहिजे, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.
"जर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर पूर्ण राज्यात आंदोलन करणार आहे. मी सुनेत्रा पवार यांच्या कानावर हा प्रकरणा टाकणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, सुनेत्रा पवार यावर निर्णय घेतील. या प्रकरणाचा पक्षाचा संबंध नाही, अजितदादांच्या लाडक्या बहिण सुरक्षित आहेत याची हमी नेत्यांनी दिली पाहिजे, असेही रुपाली पाटील म्हणाल्या.