सार्वजनिक स्वच्छतेची ‘ऐशी तैशी’
By Admin | Updated: November 12, 2014 23:11 IST2014-11-12T23:11:28+5:302014-11-12T23:11:28+5:30
बारामती शहरातील शासकीय इमारतींचे मोठय़ा धूमधडाक्यात जुलै महिन्यात उद्घाटन करण्यात आले. एकाच इमारतीत अनेक शासकीय कार्यालये कार्यान्वित होणार आहेत.

सार्वजनिक स्वच्छतेची ‘ऐशी तैशी’
प्रज्ञा कांबळे - बारामती
बारामती शहरातील शासकीय इमारतींचे मोठय़ा धूमधडाक्यात जुलै महिन्यात उद्घाटन करण्यात आले. एकाच इमारतीत अनेक शासकीय कार्यालये कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे साहजिकच कामानिमित्त येणा:या नागरिकांचा वेळ वाचावा, त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, हा त्यामागचा हेतू होता. मात्र, देखभालीअभावी शहरातील प्रशासकीय भवनाची अवस्था दयनीय झाल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले आहेत.
अवघ्या चार महिन्यांतच प्रशासकीय भवनाची ही अवस्था झाल्याने इमारती देखण्या झाल्या; मात्र त्यांची देखभाल होत नसल्याने काही महिन्यांतच प्रशासकीय भवनातील बकालपणात वाढ झाली आहे. एकाच छताखाली अनेक प्रशासकीय कार्यालये आणल्याने साहजिकच तालुक्यातील ग्रामस्थांची कामानिमित्त रोज या ठिकाणी गर्दी होते. मात्र, कोणत्या कार्यालयातील भाऊसाहेब कोणत्या ठिकाणी बसतात, याचे निर्देशक फलक कार्यालयांवर न लावल्यामुळे येणा:या नागरिकांचा वेळ वाचण्याऐवजी भाऊसाहेबांना शोधण्यातच भरपूर वेळ वाया जातो. त्याचप्रमाणो कार्यालयाचा किंवा भाऊसाहेबांचा पत्ता विचारण्यासाठी शिपाई गाठावा, तर तोही हजर नसल्याचे दिसून आले. शिपाई असला तरी तो गणवेशात नसल्याने अनेकांना तो कामानिमित्त आलेला ग्रामस्थच वाटतो. त्यामुळे भल्यामोठय़ा इमारतीत नागरिकांना कार्यालय शोधताना या मजल्यावरून त्या मजल्यावर पायपीट करावी लागत आहे. येथे अद्यापही पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, कचराकुंडय़ा, बाक तसेच स्वागतकक्षासह अनेक सोयींचा बोजवारा उडाला आहे. स्वच्छतागृहाअभावी महिलावर्गालाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुरेशा बाकांअभावी नागरिकांना खाली जमिनीवर बसावे लागत आहे. स्वच्छतेअभावी या भवनातील प्रत्येक कक्ष हा धुळीने भरलेला आहे.
4महागडय़ा फर्निचरवर धुळीचे अक्षरश: थर साचले आहेत. तसेच, दोन कक्षांमधील जागाही साफ करण्यात येत नाही. दुस:या मजल्यावर असणा:या सभागृहाशेजारील मोकळ्या जागेलाच कर्मचा:यांनी कचराकुंडीचे रूप दिले आहे.
4 ‘मीटिंग हॉल’मध्ये असलेल्या टेबलावरसुद्धा धुळीचे थर साचलेले आहेत. असेच थर प्रत्येक पायरीवर पाहावयास मिळतात. अगदी भिंतीला पोपडे पडण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे या इमारतीच्या दर्जाबाबतही शंका उपस्थित होत आहे. सर्व मजल्यांवर तसेच उभ्या असलेल्या खांबावरही काही व्यक्तींनी पान तसेच तंबाखू सेवन करून त्यांचे शिंतोडे उडवलेले आहेत.
4 महिला तसेच पुरुषांसाठी येथे दोन्ही मजल्यांवर स्वच्छतागृह आहेत. मात्र, यातील फक्त तळमजल्यावरील स्वच्छतागृहे वापरण्यात येत आहेत. उरलेली स्वच्छतागृहे बंद आहेत. महिलांसाठीची स्वच्छतागृह अतिशय खराब अवस्थेत आहे. स्वच्छतागृहाला वापरण्यासाठी पाणीही पुरेशा प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे महिलांची मोठय़ा प्रमाणात कुचंबणा होते.
सद्य:स्थितीला प्रशासकीय इमारतीच्या परिसरात वृक्षारोपणासह अन्य कामे सुरू आहेत. प्रांत, तहसील, दुय्यम निबंधकसह अन्य कार्यालये सुरू झाली आहेत. इमारतीच्या आवारात थुंकू नये, यासाठी काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅ मेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमे:यांची नजर चुकवून कामानिमित्त आलेले महाभाग, काही कर्मचारी पान, तंबाखू, गुटखा खाऊन भिंती रंगवतात. स्वच्छतागृहांमध्ये तर थांबूदेखील वाटत नाही.त्यामुळे या इमारतीच्या परिसरात राडारोड, थुंकणा:यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.