शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 20:10 IST

- हरिनामाच्या गजरात अवघड दिवे घाट पार करीत पालखी सोहळा सासवड मुक्कामी दाखल

गराडे  -  आम्हा ध्यास पंढरीचा अपार.. अवघड वाटही होते लीलया पार..! विठ्ठलाच्या नामाचा अखंड जयघोष करीत व भक्तीचे भारावलेपण घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने लाखो वैष्णवांचा साथीने ज्येष्ठ कृष्ण योगिनी एकादशी रविवार दि.२२ जून रोजी दिवे घाटातील वारीच्या वाटेवरील सर्वात कठीण टप्पा पार केला. सुमारे दोन तास घाटातील वाटचाल पूर्ण करून सोहळा संध्याकाळी सासवड मुक्कामी दाखल झाला.

माउलींचा पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी २ वा. वडकीनाला येथे विसाव्यासाठी थांबला. यावेळी वडकी ग्रामपंचायत व अनेक सार्वजनिक मंडळांनी अन्नदान केले. त्यानंतर दुपारी ३.३० वा. सर्वात अवघड टप्पा समजल्या जाणाऱ्या दिवेघाटातील वाटेने माऊलींच्या रथाचा प्रवास सुरू झाला. रथाला आकर्षक बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या. वातावरण ढगाळ स्वरूपाचे,जोरदार वाहता वारा व हवेत काहीसा थंडावा असल्याने उन्हाचा त्रास झाला नाही. आज दिवसभर पाऊस नसल्यामुळे माऊली भक्त भिजले नाहीत.मोठय़ा अंतराचा हा टप्पा चढताना न थकता दिंडीतील वारकरी निरनिराळी पदे, अभंग, भारुडे,गौळणी म्हणताना दिसत होते. वारकऱ्यांमध्ये एक वेगळेच चैतन्य संचारले होते.वैष्णवांसंगती सुख वाटे जीवाआणिक मी देवा काही नेणेगाये नाचे उडे आपुलीया छंदे मनाच्या आवडीनेअसे अभंग म्हणत टाळ मृदंगाच्या तालावर माउली.. माउली.. हा अखंड जयघोष करत पालखी सोहळा पुढे सरकत होता. सारे जण विठू नामाच्या भक्तिरसात चिंब होऊन नाचत होते. दिवे घाट चढून पालखीने सायंकाळी ६.१५ वा. पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथील माऊलींच्या विसावा तळावर माऊलींची पालखी विसावली. या वेळी संध्याछाया दिवेघाट परिसरावर पडली होती. यावेळी झेंडेवाडी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी माऊलींचे प्रचंड गर्दीत दर्शन घेतले घेतले.माऊलींच्या स्वागतासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार विजय शिवतारे, माजी मंत्री दादासाहेब जाधवराव, युवानेते बाबाराजे जाधवराव,माजी आमदार अशोक टेकवडे, सुदामआप्पा इंगळे बबूसाहेब माहूरकर,संगिता काळे,ज्योती झेंडे, हरिभाऊ लोळे,माणिकराव झेंडे,पुष्कराज जाधव,गौरी कुंजीर,राहुल गिरमे, जितेंद्र देवकर, झेंडेवाडी सरपंच वंदना खटाटे, उपसरपंच सोनाली झेंडे,ग्रामपंचायत सदस्या शरद झेंडे, शिवाजी खटाटे, पूनम झेंडे,अमर झेंडे,कौशल्या झेंडे, पोलिस पाटील सारिका झेंडे, दिवे सरपंच रुपेश राऊत,उपसरपंच शोभा टिळेकर ,माजी सरपंच गुलाब झेंडे, अमित झेंडे,योगेश काळे,ऋषीकेश झेंडे,सागर काळे, अविनाश झेंडे, राजेंद्र काळे, अजित गोळे, सचिन काळे,प्रांताधिकारी वैशाली लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ ,पोलस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, सासवड पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी,आदीसह विविध पक्ष, संस्था,संघटना पदाधिकारी, शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. झेंडेवाडी विसावा तळावर पालखी सोहळ्याचे नियोजन झेंडेवाडी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले होते. सुत्रसंचालन बाबूराव गोळे , भाऊसाहेब झेंडे यांनी केले.झेंडेवाडीनंतर दिवे गावात पालखी सोहळ्यावर दिवे ग्रामपंचायत व दिवे ग्रामस्थांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. दिवेगावा नंतर पवारवाडी, चंदन टेकडी ओलांडत पालखी सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत सायंकाळी ९ वा.विसावला . सासवड येथील मान्यवर पदाधिकाऱ्यांनी दिंडी प्रमुखांस श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन पालखी सोहळ्याचे स्वागत केले.

यानंतर पालखी तळावर समाज आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.आज योगिनी एकादशी असल्याने सासवड परिसरामध्ये वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. पंढरीच्या वारीला जाताना संत सोपानकाकाही भेटणार याचा आनंद वारकऱ्यांनी व्यक्त केला. सोमवारी (२३ जुन)सकाळी १० वा. सासवडहून संत सोपानकाकांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Maharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025