Ashadhi Wari 2025 : माउलींच्या वारीत सापडलेली सोन्याची चैन केली परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 20:33 IST2025-06-20T20:32:16+5:302025-06-20T20:33:38+5:30

आळंदी येथील भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या पत्नी कांचन येळवंडे यांना ही चैन सापडली.

Ashadhi Wari 2025 The gold chain found in Mauli possession was returned | Ashadhi Wari 2025 : माउलींच्या वारीत सापडलेली सोन्याची चैन केली परत

Ashadhi Wari 2025 : माउलींच्या वारीत सापडलेली सोन्याची चैन केली परत

आळंदी : दिघी परिसरात वारीत चालताना सापडलेली दहा तोळे सोन्याची चैन आळंदीतील कांचन येळवंडे या महिलेने प्रामाणिकपणे पोलिसांकडे जमा केली. पोलिसांमार्फत ही चैन संबंधिताला परत करण्यात आली आहे. कळंबोली येथील भाविक शैलेंद्र पाटील यांची सुमारे दहा तोळे वजनाची सोन्याची चैन चोरट्यांनी चोरली. मात्र चोरट्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि चैन खाली पडली. 

आळंदी येथील भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या पत्नी कांचन येळवंडे यांना ही चैन सापडली. कांचन यांनी प्रामाणिकपणे ही चैन दिघी पोलिसांकडे जमा केली. दरम्यान शैलेंद्र पाटील हे तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना ही चैन परत करण्यात आली. 

माऊलींनीच कांचन येळवंडे यांच्या रूपाने माझी चैन मिळवून दिली,” अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.  दरम्यान कांचन येळवंडे यांच्या प्रामाणिकपणाचे आणि तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पालखी सोहळ्यासारख्या पवित्र प्रसंगी अशी प्रामाणिकता समाजासमोर आदर्श ठरली आहे.

Web Title: Ashadhi Wari 2025 The gold chain found in Mauli possession was returned