आसावरीला शासकीय सेवेत नोकरी; आश्वासन अद्यापही अपूर्ण, मेधा कुलकर्णींनी घेतली अमित शाहांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:45 IST2026-02-13T15:45:19+5:302026-02-13T15:45:38+5:30

आसावरीच्या भविष्याचे विषय अमित शाह यांनी अतिशय संवेदनशीलतेने ऐकून घेतले आणि त्वरित लक्ष घालण्याचे आश्वासन दिले

Asawari gets a job in government service; Promise still unfulfilled, Medha Kulkarni meets Amit Shah | आसावरीला शासकीय सेवेत नोकरी; आश्वासन अद्यापही अपूर्ण, मेधा कुलकर्णींनी घेतली अमित शाहांची भेट

आसावरीला शासकीय सेवेत नोकरी; आश्वासन अद्यापही अपूर्ण, मेधा कुलकर्णींनी घेतली अमित शाहांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळेला शासकीय नोकरी जाहीर करण्यात आली.  पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेले पुण्यातील स्वर्गीय संतोष जगदाळे यांचे कुटुंब आजही त्या दुःखातून सावरत आहे.

आसावरी यांचा पुणे महापालिकेने नोकरीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला. त्यानुसार आसावरी यांना पुणे महापालिकेने वर्ग दोन आणि वर्ग तीनमधील चार पदांपैकी एका ठिकाणी नोकरीचा मार्ग मोकळा झाला होता. आता या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर आसावरी जगदाळे यांना महापालिकेत नोकरी मिळणार असल्याचे सांगण्यात आले. आसावरी जगदाळे यांनी महापालिकेकडे त्यांच्या शिक्षणाची माहिती सादर केली. त्यानुसार त्यांना प्रशासन अधिकारी (वर्ग-२), उप अधीक्षक (वर्ग-३), संगणक ऑपरेटर (वर्ग-३) आणि लिपिक टंकलेखक (वर्ग-३) या चार पदांपैकी कुठल्याही पदावर त्यांची नियुक्ती करणे शक्य असल्याचा अहवाल प्रशासनाने राज्य सरकारला पाठवला होता. पण अद्यापही आसावरी यांना नोकरी मिळाली नाही. याबाबत खासदार मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजी यांची भेट घेऊन आसावरीला दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याची माहिती त्यांना सांगितली. 

कुलकर्णी यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेले पुण्यातील स्वर्गीय संतोष जगदाळे यांचे कुटुंब आजही त्या दुःखातून सावरत आहे. त्यांची मुलगी आसावरी हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याने श्रीमती जगदाळे आणि आसावरी काही दिवसांपूर्वी भेटायला आल्या होत्या. शासकीय सेवेसंदर्भात महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारने योग्य ते सूचित करावे, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आसावरीच्या भविष्याचा विषय त्यांनी अतिशय संवेदनशीलतेने ऐकून घेतला आणि त्वरित लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. याच भेटीत सहकारी बँकांशी संबंधित काही महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा झाली.

Web Title : आसावरी को नौकरी का वादा अधूरा; मेधा कुलकर्णी ने अमित शाह से मुलाकात की

Web Summary : पहलगाम हमले के बाद आश्वासनों के बावजूद, आसावरी जगदाले को सरकारी नौकरी का इंतजार है। मेधा कुलकर्णी ने अमित शाह को अधूरे वादे के बारे में बताया और परिवार के लिए केंद्रीय हस्तक्षेप की मांग की।

Web Title : Job Promised to Asawari Delayed; Medha Kulkarni Meets Amit Shah

Web Summary : Despite assurances after the Pahalgam attack, Asawari Jagdale awaits her government job. Medha Kulkarni informed Amit Shah about the unfulfilled promise, seeking central intervention for the family.