Pune News: पुण्यात भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून तब्बल ४७ लाख लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 12:53 IST2023-03-23T12:52:48+5:302023-03-23T12:53:17+5:30
नाना पेठेतील व्यापारी बँकेत पैसे जमा करण्यासाठी चालला होता

Pune News: पुण्यात भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवून तब्बल ४७ लाख लुटले
पुणे/किरण शिंदे : पुण्यातील नाना पेठेत दिवसाढवळ्या तरुणांनी व्यापाराला लुटले. नाना पेठेतील आझाद आळी मधून टू व्हीलर वरून आलेल्या दोघांनी कोयता दाखवून पैश्याने भरलेली पिशवी पळवली आह. समर्थ पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तंबाखूचा व्यापारी नेहमीप्रमाणे बँकेत पैसे जमा करण्यासाठी दुचाकी वर जात असताना नाना पेठ येथील आजाद आळी मधून बाहेर येतात दोन तरुणांनी दुचाकीवरून येऊन या व्यापाऱ्याला अडवले. गाडीवरून उतरून त्या दोन तरुणांनी व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील पैशाने भरलेली पिशवी ही घेऊन ते दोघेही पसार झाले. व्यापारी असल्याच्या कारणामुळे दररोज बँकेत पैसे जमा करण्यासाठी मोठी रक्कम ते घेऊन जात असतात. या पिशवीत तब्बल ४७ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.