लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल ३२ कर्मचाऱ्यांची एकाच वेळेस बदली; पोलीस आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:14 IST2026-02-19T15:14:06+5:302026-02-19T15:14:22+5:30

एकाच ठाण्यातील एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने संपूर्ण पुणे शहर पोलिस दलात जोरदार चर्चा रंगली आहे.

As many as 32 employees of Loni Kalbhor Police Station transferred at once Police Commissioner orders | लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल ३२ कर्मचाऱ्यांची एकाच वेळेस बदली; पोलीस आयुक्तांचे आदेश

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल ३२ कर्मचाऱ्यांची एकाच वेळेस बदली; पोलीस आयुक्तांचे आदेश

लोणी काळभोर : पुणे शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडवणारा निर्णय समोर आला असून लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तब्बल ३२ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव एकाच वेळी बदल्या करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (दि. १८) रात्री उशिरा परिपत्रकाद्वारे जारी केला.

एकाच ठाण्यातील एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने संपूर्ण पुणे शहर पोलिस दलात जोरदार चर्चा रंगली आहे. या निर्णयामागील नेमके कारण काय? अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर हालचाल का? याबाबत तर्क-वितर्काना उधाण आले आहे. दरम्यान, बहुसंख्य कर्मचाऱ्यांची बदली लोहगाव, विमानतळ, चंदननगर आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यांकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोहगाव व विमानतळ पोलीस ठाण्यांकडे मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हलविण्यात आले आहे. पोलीस दलात खळबळ एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात बदली आदेश निघाल्याने पोलिस दलात उलटसुलट चर्चा सुरू आहे काहीजण याकडे नियमित प्रशासकीय प्रक्रिया म्हणून पाहत असले, तरी काहींमध्ये या निर्णयामागील कारणांबाबत उत्सुकता आणि संभ्रम व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या मोठ्या फेरबदलामुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कामकाजावर काय परिणाम होणार, तसेच नव्या मनुष्यबळासह संबंधित ठाण्यांची कार्यपद्धती कशी बदलणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

काय आहे आदेशात?

 पुणे शहर पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (एन) अन्वये हे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार ३ सहाय्यक फौजदार,१० पोलीस हवालदार, १९ पोलीस अंमलदार यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस अंमलदार इंद्रजीत जालिंदर डाडर यांची वैद्यकीय व कौटुंबिक अडचणीमुळे विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे. तत्काळ कार्यमुक्तीचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी नव्या ठिकाणी हजर झाल्याचा अनुपालन अहवाल कार्यालयात सादर करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे.

Web Title : सामूहिक तबादला: लोनी कालभोर पुलिस स्टेशन से 32 अधिकारियों का तबादला

Web Summary : पुणे पुलिस आयुक्त ने प्रशासनिक कारणों से लोनी कालभोर स्टेशन से 32 अधिकारियों का तबादला कर दिया। इस सामूहिक तबादले से पुलिस बल में चर्चा छिड़ गई है, जिससे अंतर्निहित कारणों और स्टेशन के संचालन पर संभावित प्रभाव को लेकर सवाल उठ रहे हैं।

Web Title : Mass Transfer: 32 Officers Transferred from Loni Kalbhor Police Station

Web Summary : Pune Police Commissioner transferred 32 officers from Loni Kalbhor station due to administrative reasons. The mass transfer sparks discussion within the police force, raising questions about the underlying reasons and potential impact on the station's operations.