शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

छोटा शेख सल्ला दर्गाच्या मिळकत प्रकरणी फसवणूक करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 19:15 IST

आरोपीने खोट्या आश्वासनावर बारा वर्ष ठेवले होते खेळवत

ठळक मुद्देफिर्यादीकडून उकळले साडे तीन कोटीं

पुणे: कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्गा ट्रस्टच्या मिळकतीच्या विकसनाचे अधिकार स्वत:कडे असल्याचे भासवून ट्रस्टमधील काही व्यक्तीशी संगनमत करुन एका कंपनीची सुमारे साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नुकतीच एकाला अटक केली.

अमिन नूर महंमद शेख (रा. जय शिवशंकर सोसायटी, आळंदी रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओमेगा प्रिमायसेस प्रा. लि. कंपनीच्या वतीने शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी अमिन नूर महंमद शेख, सलिम मौला पटेल, नबीलाल मोमीन, फारुख आत्तार, इलियास पशुमनैया सय्यद आणि मुनावर गुलाब खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कंपनीकडे २००७ मध्ये अमिन नूर महंमद शेख यांनी आपल्याकडे ट्रस्टच्या व्यक्तीचे कुलमुख्यत्यारपत्र असल्याचे सांगितले. या ट्रस्टच्या मिळकती फिर्यादी कंपनीस आवश्यक ती सर्व कामे करुन तबदील करुन देण्याचे आश्वासन दिले. वेळोवेळी फिर्यादीकडून सुमारे साडेतीन कोटी रुपये उकळले. मुस्लिम दर्गा, मशीद यांच्या मिळकतीबाबत व्यवहार करायला सर्वाच्च न्यायालयाने निर्बंध आणले. छोटा शेख सल्ला दर्गा ट्रस्टच्या बाेर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्यांना मिळकतीसंबंधी विकसित करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. परंतु, फिर्यादी यांना खोट्या भूलथापा मारुन कोणतेही मिळकतीचे हक्क व अधिकार न देता खोट्या आश्वासनावर १२ वर्षे खेळवत ठेवले. पैसे परत न देता फसवणूक केली. अखेर कंपनीच्या वतीने २०१८ मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. शिवाजीनगर पोलिसांनी आता याप्रकरणात अमिन शेख याला नुकतीच अटक केली. अशा स्वरुपाचे आणखी काही गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस